Ajit Pawar News Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? अजितदादांनी स्पष्टच सांगितले…

Ajit Pawar News : शिवसेना (Shiv Sena) पक्षा संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरु आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar News : शिवसेना (Shiv Sena) पक्षा संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात सध्या सुनावणी सुरु आहे. त्यावरील सुनावणी उद्या (ता. ३०) जानेवारी होणार आहे. या सुनावणी संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे.

शिवसेना पक्षा संदर्भात निवडणूक आयोगासमोरील (Central Election Commission) युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला आहे. मागील सुनावणीवेळी ठाकरे गटाच्या आणि शिंदे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला होता. त्यानंतर आयोगाने लेखी युक्तीवाद सादर करण्याचे आदेश दिले होते.

पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: शिवाजी पार्कवरील एका सभेत सांगितले होते, की आता माझ्यानंतर या शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे हे सांभाळतील. तुम्ही त्यांना साथ द्या, सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभे रहा, तसेच युवा म्हणून ती जबाबदारी आदित्य ठाकरे घेतील, असे त्यांनी सांगितले आहे, त्यामळे त्याची नोंद शिवसैनिकांनी घ्यावी. असे पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला आहे. ४० आमदार, १२ खासदार व अनेक पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आपल्याबरोबर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी, आमदार व खासदार आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT