Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

प्रभाग रचनेवरुन अजितदादांनी टोचले आघाडीच्या नेत्यांचे कान

अगामी महानगर पालिकांच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्रिसदस्यीय प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले. आघाडी सरकारमध्ये निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वांनी भूमिका मांडायची असते. मात्र, एकदा निर्णय झाला की सर्वांनी समाधानी राहायचे असते, असे मत पवार यांनी व्यक्त केले. पवार यांनी प्रभाग रचनेवरुन नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना टोला लगावला आहे. (Ajit Pawar said on the three-member ward)

अजित पवार मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. अगामी महानगर पालिकांच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पवार म्हणाले, आघाडीचे सरकार असताना निर्णय झाल्यावर नेहमी समाधानी राहायचे असते. त्यात पुन्हा वेगळे वक्तव्य करुन कारण नसताना गैरसमज पसरायचे नसतात. निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वजण आपली भूमिका प्रकर्षाने मांडत असतात. मात्र, निर्णय घेतला की त्या निर्णयाचे समर्थनच आम्ही करत असतो. त्यामुळे हा त्रिसदस्यीय प्रभाग रचना निर्णय आता महाविकास आघाडी सरकारचा निर्णय झाला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी राज्यात होईल.

मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला. कोणाचाच विरोध नव्हता वेगवगेली मत होती. काँग्रेसनेते अशोक चव्हाण म्हणाले चारचा प्रभाग करा. सगळ्यांचे ऐकून घेऊन मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी काय करायचे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसचे इतर मान्यवर होते. त्यामुळे या निर्णयाने आकाश कोसळले असे मानायचे कारण नाही, असे पवार म्हणले.

यावेळी मराठवाडा आणि विदर्भातील पुरस्तितीवर पवार यांनी भाष्य केले ते म्हणले, वेगवेगळ्या पक्षांकडून ओला दुष्काळा जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मात्र, संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय असा निर्णय करता येणार नाही.

पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. पालकमंत्री त्या त्या भागात दौऱ्यावर आहेत. अडचणीतल्या माणलाला मदत करायचे काम सुरु, असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने दुजाभाव करु नये. कारण आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे, असा आरोप पवार यांनी केला.

एमपीएससीच्या भरती प्रक्रिये संदर्भात बोलताना अजित पवार म्हणले, कालच मुख्य सचिवांना सांगितले आहे. ज्या विभागांचे प्रस्ताव आला ते MPSC ला पाठवून द्या. उद्या याबाबत आढावा बैठक घेऊ. कोणत्या विभागाने माहिती दिली कोणी नाही दिली, याची माहिती घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT