तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने बंडखोरांना बसणार वेसन

तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे बंडखोरांना वेसन लागणार असून पक्षाची उमेदवारी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Pmc Election
Pmc ElectionSarkarnama
Published on
Updated on

पुणे, ता. २३ : तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे आगामी महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय पक्षांना महत्त्व प्राप्त झाले आहे. तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे बंडखोरांना वेसन लागणार असून पक्षाची उमेदवारी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

एक किंवा दोन सदस्यांचा प्रभाग असला तर त्या-त्या भागातील ताकदवान कार्यकर्ते एकत्र येतात व बंडखोरी करत निवडणूक लढवतात. मात्र, तीन किंवा चार सदस्यीय प्रभागात हे शक्य होत नाही. त्यामुळे बंडखोरीला आपोआपच वेसन बसते.

तीन सदस्यांचा प्रभाग झाल्यास पुण्यात ५६ प्रभाग व १६७ नगरसेवक होतील.पुणे महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयाला कॉंग्रेसने आज विरोध दर्शविला आहे.त्यामुळे तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निर्णयात बदल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.

Pmc Election
प्रभाग पद्धत अल्पसंख्यांकांवर अन्याय करणारी...

राज्य निवडणूक आयोगाने एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय २६ ऑगस्टला घेतला. जर एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणुका झाल्या असत्या तर, त्याचा फायदा पक्षांपेक्षा इच्छुक उमेदवारांनाच अधिक होण्याची शक्यता होती. दांडगा जनसंपर्क, आर्थिक ताकद आणि त्यानंतर पक्षाच्या मदतीच्या जोरावर महापालिकेत सभासद होण्याची अनेकजणांना होती. मात्र, तीन सदस्यीय प्रभागाच्या निर्णयाने त्यावर पाणी फिरले आहे.

महापालिकेची निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहेत.या निवडणुका एक सदस्यीय किंवा बहुसदस्यीय पद्धतीने होणार? याबाबत राजकीय कार्यकर्त्यांमधील उत्सुकता संपुष्टात आली. जर एक किंवा दोन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणुका झाल्या असत्या तर राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरली असती. आता या निर्णयामुळे इच्छुकांपुढील डोकेदुखी वाढणार आहे. या निर्णयाने निवडणूकपूर्व युती-आघाडी होण्याची शक्यता आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये महाआघाडी म्हणून निवडणूक लढविणार आहेत.

Pmc Election
`शरियत` सारखा कायदा महाराष्ट्रात आणा!

राज्यातील सर्वच महापाालिकांमधील निवडणुका २०११ च्या जनगणेनेनुसार होणार असल्याने सदस्यसंखेवरदेखील मर्यादा येणार आहेत. तीन सदस्यीय प्रभागांमध्ये मतदारसंघ्या ५५ हजार ते ७० हजार या दरम्यान राहणार आहे.राजकीय पक्षांच्या दृष्टीकोनातून विचार केला तर तीन सदस्यीय प्रभाग झाल्याने भारतीय जनता पार्टीचे नेते आणि इच्छुक कार्यकर्ते आनंदात आहेत.भाजपाच्या दृष्टीने दोन सदस्यीय प्रभागापेक्षा तीन सदस्यीय प्रभाग बरे अशी प्रतिक्रिया असून राष्ट्रवादी व कॉंग्रेस मात्र दोन सदस्यीय प्रभाग रचनेच्या बाजूचे आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com