Maharashtra Politics Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Deputy CM: विरोधीपक्षनेताच सत्तेत सहभागी ; उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार..

Big Breaking In Maharashtra Politics : काही दिवसा पूर्वी 'जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार," अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली होती.

सरकारनामा ब्युरो़

Mumbai News : महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्या बंडामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यातील विरोधीपक्षनेताच थेट सत्तेत सहभागी झाला आहे.

राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदार अजित पवारांसह राजभवनात हजर आहेत. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि इतर 9 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. अजित पवार आता सरकारमध्ये सामील झाले आहेत. काही दिवसा पूर्वी 'जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार," अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली होती.

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम, नीलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील आणि सरोज अहिरे उपस्थित होते. यापैकी नऊ जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अजित पवार यांनी आज बोलावलेल्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होते.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT