Mahayuti Press Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar on Eknath Shinde - VIDEO : अन् अजितदादा फडणवीसांसमोरच एकनाथ शिंदेना म्हणाले, 'तुम्हाला खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी..'

Mahayuti Press Conference : जाणून घ्या, नेमकं काय घडलं? ; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस महायुतीच्या पत्रकारपरिषदेत घडला मजेशीर किस्सा.

Mayur Ratnaparkhe

Eknath Shinde and Ajit Pawar Latest news: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून(३ मार्च) सुरू होत आहे. तत्पुर्वी काल(ऱविवार) अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस महायुती सरकारने म्हणेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकत्रित पत्रकारपरिषद घेतली.

ज्यामध्ये या अधिवेशनाबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट केली गेली. दरम्यान यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस अन् मीडियासमोरच एकनाथ शिंदेना मिश्किलपणे टोला लगावल्याचे दिसून आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) मीडियासमोर बोलताना मिश्किलपणे म्हणाले, ‘’सरकारची ही नवीन टर्म असली तरी आमची टीम मात्र जुनीच आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची अदलाबदल झालेली आहे. पण अजितदादांची खुर्ची मात्र फिक्स आहे. दादांचं बरंय आपलं’’ हे ऐकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस अन् अजित पवारांसह पत्रकारपरिषेदस उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आलं अन् वातावरण एकदम हलकंफुलकं झालं.

तर यानंतर जराही वेळ न घालवता अजित पवारांनीही(Ajit Pawar) संधी साधत आपला हजरजबाबीपणा दाखवला अन् म्हणाले की, तुम्हाला तुमची खुर्ची फिक्स ठेवता आली नाही, त्याला मी काय करू? त्यावर एकनाथ शिंदे अन् फडणवीसांसह हॉलमध्ये सर्वांनाच हसू आले हॉलमध्ये एकच हशा पिकला.

वातावरण चांगलेच हलकेफुलके झाले होते, तेवढ्यात मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनीही यात आपलं मत मांडत आमची खुर्ची फिरती आहे, असं म्हटलं अन् पुन्हा एकदा सर्वच खळखळून हासले. अशाप्रकारे तिन्ही नेत्यांनी महायुतीमध्ये तणावाचे नाहीतर हसतेखेळते वातावरण आहे, हे एकप्रकार यावेळी दाखवून दिले.

तत्पुर्वी सरकारकडून अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या पूर्वसंध्ये आयोजित चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. ज्यावरून महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी विरोधकांवर टीका केली. तर अधिवेशन हे अजिबात गुंडाळल्या जाणार नाही, चार आठवडे अधिवेशन चालणार असल्याचंही यावेळी स्पष्ट केले गेले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT