
Pune latest crime News : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण ताज असताना पुन्हा एकदा पुणे बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. ,शिरूर मध्ये तरुणीला चाकुचा धाक दाखवत दोन जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पुण्यातील गुन्हेगारी घटना बघता पुण्यात चाललंय तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होत आहे.
पुण्याच्या स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्काराचे प्रकरण ताजं असतानाच, पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एक तरुणी आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना मध्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवत आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या परिसरात घडला आहे.
घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ ॲक्शन घेत दोन आरोपींना 12 तासाच्या आत अटक केला आहे. अमोल पोटे (वय 25) रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे मुळ राहणार (रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि.अहील्यानगर) आणि किशोर काळे (वय ल29 ) रा. कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ (रा. किल्ले धारुर, ता.धारुर जि.बीड) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेला माहितीनुसार एक 19 वर्षीय तरुणी तिच्या २० वर्षीय मामेभावासोबत रात्रीच्या सुमारास कारेगाव येथून घरी जात असताना घराच्या काही अंतरावर गप्पा मारत उभी होती. त्यावेळी रात्री 11 वाजताच्या सुमारास दुचाकीवर दोघेजण तिथे आले. त्यांनी तरुणी आणि तिच्या मामेभावाला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने दोघांचे मोबाईलमध्ये फोटो घेत व व्हिडीओ शुटींग केले.
त्यानंतर पीडित तरूणीच्या मामे भावाला त्यातील एकाने थोड्या अंतरावर घेवून गेला तर दुसऱ्याने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर दुसऱ्यांने देखील पिडीतेवर बलात्कार केला आणि तिच्या गळयातील सोन्याचे दागिने हिसकावून ते दोघेही निघून गेले.
या घटनेची माहिती पीडितेने आपल्या बहिणीला दिल्यानंतर कुटुंबातील इतर व्यक्तींनी पोलिसांशी संपर्क साधला. घटनेचा गांभीर्य पाहता पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोघांना 12 तासाच्या आत अटक केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.