Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : अजितदादांचा दोन दिवसांत दोन नेत्यांना दम; ऐन पावसात महाराष्ट्राचं राजकारण तापलं

Ashok Pawar, Nilesh Lanke : अशोक पवारांचे अजित पवारांना सडेतोड तर निलेश लंकेंचे मवाळ उत्तर.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : धडाकेबाज, स्पष्ट बोलणारे, बोलले ते खरे करून दाखवणारे अशी ख्याती असलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आताही दोन दिवसांत दोन आमदारांना दम दिला आहे. शिरूरचे आमदार अशोक पवार आणि दक्षिण नगर लोकसभेचे आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांना दादांनी बघून घेण्याची भाषा केली. अजितदादांच्या या दमाच्या भाषेने राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे. परिणामी राज्यातील वातावरण तापले आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी घेतलेल्या सभेतून गुरुवारी (ता. 9) अजितदादांनी अशोक पवारांना Ashok Pawar दम दिला. ते म्हणाले मंत्रिमंडळात दिलीपराव वळसे पाटलांना स्थान दिले आणि त्यांची सटकली. आता आपले काही जमणार नाही, असे त्यांनी शेजारच्या आमदारांना त्यांनी सांगितले. हे मला समजले. त्यानंतर ते तिकडे गेले. आता त्यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवले आहे. मंत्रिपदाची स्वप्न पाहणारे आता आमदार कसा होतो, तेच बघतो असे आव्हान अजितदादांनी अशोक पवारांना दिले.

अशोक पवारांनी इशारा दिल्यानंतर अजित पवारांनी Ajit Pawar नीलेश लंकेंकडे आपला मोर्चा वळवला. नगर दक्षिणमध्ये कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात त्यांची शुक्रवारी (ता. १०) सभा झाली. यावेळी त्यांनी लंकेंना धारेवर धरले. गडी दिसतो बारका, पण लय पोहोचलेला आहे. अरे, नीलेश बेटा! ज्या शाळेत तू शिकतो, त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे. तू धमक्या देऊन आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देतो काय? आणि मी तुझ्या मागे लागलो तर, तुझा कंडच जिरवील. सतत तुझ्या डोळ्यासमोर अजित पवारच येईल. माझ्या नादी लागू नको. मी पुरता बंदोबस्त करतो. तू तर, झाड की पत्ती है! मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत. माझ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का आल्यास बघून घेईल, असा इशारा अजितदादांनी लंकेंना दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दम दिल्यानंतर अशोक पवारांनी अजितदादांना सडेतोड उत्तर दिले. जनता आणि शरद पवार अशोक पवारांना आमदार करायचे की नाही हे ठरवतील. मी अजितदादांच्या विधानाला महत्व देत नाही. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही दम देता, हे कशाचं द्योतक आहे? राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी अशी भाषा वापरु नये. कुणी बोलले म्हणून पडत नाही. ज्याच्या कपाळावर लिहिलेय, ते कुणी पुसू शकत नाही, असा पलटवार पवारांनी केला. तर लंकेंनी Nilesh Lanke अजित पवारांनी कितीही आक्रमक बोलले, तरी तुमच्या मनात माझ्याविषयी असणारे हे खरे प्रेम कधीही कमी होणार नाही, असे सूचक विधान केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT