Lok Sabha Election 2024 : शरद पवार, उद्धव ठाकरे, राजसाहेब, देवेंद्र फडणवीसांच्या सभांचा धुव्वाच धुव्वा'!

Pune, Marathwada News : राज्यात शुक्रवारी दुपारनंतर अचनाकच वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी धुवांधार बॅटिंग केली.
Ajit Pawar Sabha
Ajit Pawar SabhaSarkarnama

Maharashtra Political News : ज्येष्ठ नेते शरद पवारांची साताऱ्यात झालेली पावसातील सभा देशभर गाजली. त्यावेळी पावसानेच सभा जिंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. राज्यभरातील आपल्या उमेदवारांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या सभा - रॅली आयोजित केल्या होत्या. मात्र या सभा - रॅली अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे रद्द कराव्या लागल्या आहेत. सभास्थळांचा या पावसामुळे पुरता धुव्वा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

राज्यात शुक्रवारी (ता. 10) दुपारनंतर अचनाकच वादळवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी धुवांधार बॅटिंग केली. परिणामी ठिकठिकाणी होणाऱ्या उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह इतर नेत्यांच्या सभा रद्द करण्याची वेळ आली. याचा फटका संबंधित उमदेवारांना बसण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीचे जालन्यातील उमेदवार कल्याण काळे यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांचा दौरा होता. मात्र जालना जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे हवामान खराब झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॅाप्टर उड्डाण करून शकत नसल्याने ठाकरेंचा दौरा रद्द करम्यात आला. ते छत्रपती संभाजीनगरहून हेलिकॅाप्टरने कल्याण काळे यांच्या प्रचारासाठी जालना येथे जाणार होते.

छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शुक्रवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या वतीने मोठी तयारी करण्यात आली. मात्र अवकाळी पावसामुळे खुर्च्या आडव्या झाल्या आहेत. तेथे पाणी साचल्याने ही सभा रद्द होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar Sabha
Raksha Khadse : रक्षा खडसेंचं मोठं पाऊल; रावेर पुन्हा काबीज करण्यासाठी कट्टर विरोधकाच्या घरी

पुणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar आणि आदित्य ठाकरेंची सभा रद्द करण्यात आली. पुण्यात पवारांची तर वडगाव शेरी येथे पवार आणि आदित्य यांची एकत्रित सभा होती. या दोन्ही सभा पवासामुळे होणार नाहीत. अवकाळी पावसाने सभास्थळी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले आहे.

पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या Raj Thackeray सभेचे आयोजन केले होते. पाऊस झाला तरी ही सभा होणारच, असे मनसेचे कार्यकर्ते ठामपणे सांगत होते. त्यानुसार पाऊस कमी झाल्याने त्यांनी तयारीही सुरू केली होती. मात्र अचानक जास्त पाऊस पडल्याने राज यांची सभा रद्द करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी Ajit Pawar कोंढवा येथे रॅलीचे आयोज केले. ही रॅली पावसात पार पडली. मात्र त्यानंतर त्यांची शिरूर येथे सभा होणार होती. त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचले. तसेच बैठक व्यवस्थेवरही पावसाचा परिणाम झाला. यामुळे अजित पवारांची शिरूर येथील सभा रद्द करण्यात आली.

Ajit Pawar Sabha
Uddhav Thackeray Sabha News : आम्हांला नकली म्हणालात, पण शिवसेनेचा दणका काय असतो, ते 4 जूनला निकालातून कळेल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com