Jitendar Awhad News :  Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : पहाटेच्या शपथविधीला आव्हाडांचा पाठिंबा होता? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ !

Ajit Pawar With Devendra Fadnavis Mornig Oath : जे कुणी म्हणतात की, शाहू-फुले- आंबेडकरांच्या विचारधारेचा एकच नेता माणूस आहे.

Chetan Zadpe

Karjat News : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची २०१९ ला झालेल्या पहाटेच्या शपथविधीचं कवित्व काही केल्या संपतच नाही. आज अजितदादा आणि फडणवीस एकत्रित सत्तेत असले तरी पहाटेचा शपथविधी हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वर्तुळात कायमच चर्चेचा विषय राहिला. आज याच पहाटेच्या शपथविधीसंबंधी खासदार सुनील तटकरे यांनी भाष्य केले. अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचाही पाठिंबा असल्याचा खळबळजनक दावा केला. (Latest Marathi News)

पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित करत तटकरे म्हणाले, "अजितदादांनी भाजपसोबत जाण्यापूर्वी सर्वांनाच विचारणा केली होती. त्यानुसार भाजपसोबत जाण्यासाठी सर्व आमदारांनी सहमती दर्शवत सह्या केल्या होत्या, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला.

तटकरे म्हणाले, "पहाटेचा नाही, सकाळी आठ वाजता शपथविधी झाला. अजितदादांच्या कार्यालयात त्यावेळी बैठक पार पडली. एकत्रितपणे सर्व आमदारांच्या सह्यांचं निवेदन तयार केलं. ते आज जे कुणी म्हणतात की, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेचा एकच नेता माणूस आहे. जे ठाण्याच्या परिसरात असतात. (जितेंद्र आव्हाड) त्यांची पण सही झाली. प्रमुख नेत्यांची कमिटी झाली, अन् भाजपसोबत बोलणी सुरू झाली," असे तटकरे म्हणाले.

अजितदादांमुळेच पक्ष उभा राहिला -

अजितदादांमुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिला आहे. पक्षासाठी दिलेलं अजितदादांनी योगदान कुणीही विसरू शकत नाही. 2019 मध्ये आपण सरकारमध्ये आलो, पण तेव्हा युतीला स्पष्टपणे जनतेचा कौल मिळाला होता. महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला हेसुद्धा अघटित आहे. यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, असेही तटकरे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT