Nashik : हिरे कुटुंबीयांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्याची मालिका सुरूच आहे. ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे ( Advay Hiray) यांच्यापाठोपाठ त्यांचे मोठे बंधू अपूर्व हिरे (Apoorva Hiray) यांच्यावर नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा काल (बुधवारी) दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या भद्रकाली पोलिस ठाण्यात अद्वय हिरे आणि अपूर्व हिरे यांच्या विरोधात आज (गुरुवारी) पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही बंधूंवर आत्तापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत.
हिरे महाविद्यालयात नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत 10 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आता दोन्ही बंधूंच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
1 कोटी 56 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. शहर आणि जिल्ह्यातील एकूण 10 शिक्षण संस्थांना हा निधी मिळाला होता. ज्या कारणासाठी निधी मिळाला तो अन्य कारणासाठी वापरल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अद्वय हिरे सध्या एका गुन्ह्यात तुरुंगात आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
रेणुका सूतगिरणी कर्ज फसवणूकप्रकरणी मालेगाव न्यायालयाने अद्वय हिरे ( Advay Hiray) यांचा जामीन नुकताच अर्ज फेटाळला. अद्वय हिरे यांनी त्यांच्यावरील गुन्ह्याचा तपास प्रगतिपथावर आहे, त्यामुळे हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात, असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला.
अद्वय हिरे यांनी घेतलेले 7 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज आज 32 कोटींपर्यंत पोहोचले आहे. यातील एकही हप्ता हिरे यांनी भरलेला नाही. ते पैसे ज्या सूतगिरणीसाठी घेतलेले होते, पण तिथे न वापरता इतरत्र वापरले. म्हणून त्यांच्यावर एमपीआयडीअंतर्गत गुन्हा दाखल आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.