Mumbai News : राज्यातल्या राजकीय घडामोडींनंतर आता भाजपच्या आमदारांची एक बैठक होत आहे. विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहाच्या भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होत आहे. उद्या सायंकाळी (ता. ७ ) बैठकीचं आयोजन केलं जात आहे. मुंबईच्या गरवारे क्लब इथे ही बैठक पार पडेल. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित आले आहेत. (Ajit Pawar's entry angered the BJP MLAs along with the Eknath Shinde group)
अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट भाजपमध्ये सत्तेचा वाटेकरी झाल्याने, भाजपमध्ये काही आमदार नाराज आहेत, अशी चर्चा रंगू लागली आहे. या नाराज आमदारांची नाराजी या बैठकीत दूर केली जाईल, अशी माहिती आहे.
भाजपने त्यांच्या विधानसभेच्या आणि विधानपरिषेदेच्या आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलावले आहे. राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणानंतर भाजपच्या आमदारांमध्ये नाराजी आहे आणि हीच नाराजी दूर करण्यासाठी ही बैठक बोलावल्याची चर्चा होत आहे. आता सत्तेत तीन पक्ष आल्याने नव्या समीकरणासोबत आपल्याला जुळवून घ्यावे लागणार, याबाबतही बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरही येत्या काळात कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, याबाबत कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, याबाबत सूचना केले जाणार आहेत. (Latest Marathi News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.