Narhari Zirwal News: आता झिरवाळांचे भवितव्य `श्रीरामा`च्या हाती!

NCP Political Crisis: अजित पवार यांच्या गोटात गेलेल्या विधानसभेच्या माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांची वाट बिकट?
Shreeram Shete & Narhari Zirwal
Shreeram Shete & Narhari ZirwalSarkarnama
Published on
Updated on

Narhari Zirwal News : दिंडोरी- पेठ विधानसभा मतदार संघाचे आमदार नरहरी झिरवाळ यांची अजित पवार यांच्या गटात उपस्थिती तालुक्यातील जनतेच्या भुवया उंचावणारी ठरली. त्यातच, तालुक्यातील नेतृत्व श्रीराम शेटे यांच्यासह ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पाठींबा दर्शविल्याने झिरवाळांची डोकेदुखी वाढणार असून, यंदा विधानसभेच्या वारीची वाट बिकट होणार हे निश्‍चित मानले जात आहे. (Narhari Zirwal`s political way is with various political speed breakers)

दिंडोरी मतदारसंघात कोळी आणि कोकणा हे आदिवासी (Trible) मतदार प्रत्येकी सुमारे पंचवीस हजार आहेत. त्यात कोकणा झिरवळांचे (Narhari Zirwal) पाठीराखे तर कोळी शिवसेनेच्या (Shivsena) रामदास चारोस्करांचे पाठीराखे आहेत. यात निर्णायक मते शरद पवार (Sharad Pawar) गटाचे श्रीराम शेटे यांच्याकडे आहेत. त्यामुळे झिरवळ अजित गाटत व त्यांचे भवितव्या शरद पवार गटावर अवलंबून आहे.

Shreeram Shete & Narhari Zirwal
Jalgaon NCP News : मंत्री गुलाबराव पाटील यांना निवडणुकीत आव्हान देणार!

या मतदारसंघात झिरवाळ निवडून येत होते ते मराठा व अन्य समाजाच्या मतादारांच्या पाठींब्याने. हा मतदार सध्याच्या स्थितीत पुर्णतः श्रीराम शेटे यांच्या कलाने वळणारा आहे. श्री. शेटे शरद पवार यांच्यासमवेत गेले आहेत. अशा स्थितीत आगामी निवडणुकीत अतिशय टोकाची राजकीय स्थिती असेल. सामान्यतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत येथे लढत होते. त्यात शरद पवार महाविकास आघाडीसोबत राहिल्यास महाविकास आघाडीकडून रामदास चारोस्कर हे स्वतःचे मतदार असलेले शिवसेनेचे उमेदवार असू शकतील. त्यात श्री. शेटे निवडणूकीचा कल फिरवू शकतात.

तालुक्यातील बहुतेक नेत्यांनी आज मुंबईतील बैठकीला हजेरी लावत आपण शरद पवारांसोबतच असल्याचे दाखवून दिले आहे. दुसरीकडे झिरवाळांनी मात्र अद्याप मतदारसंघात प्रवेश न केल्याने त्यांची भुमिका स्वखुशीने की बळजबरीने हे कळणे अवघड झाले आहे. विधाभसा निवडणूकीत झिरवाळांना पर्याय देण्याची वेळ आल्यास श्री. शेटे यांचे कट्टर समर्थक भास्कर भगरे यांचे नाव पुढे येत आहे. त्या दृष्टीने कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार रामदास चारोस्कर व शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले यांनीदेखील विधानसभेची जय्यत तयारी केली आहे. परंतू ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार, याबाबत गोंधळाची स्थिती आहे. त्यामुळे झिरवाळांपुढे पर्याय म्हणून श्रीराम शेटे यांच्याशी संगनमत करुन या दोघांमध्ये समेंट घडवून आणण्याची रणनितीदेखील आखली जावू शकते. त्यातच श्री. महाले यांना लोकसभेचे वेध लागल्याने विधानसभेसाठी श्री. चारोस्कर यांचे नाव पुढे येवू शकते. या माध्यमातून झिरवळांसमोर खंबीर आव्हान उभे करण्यासाठी राजकीय समीकरणे जुळवली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा पार्श्‍वभूमीवर शेटे यांचीच भुमिका निर्णायक ठरणार असल्याने, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shreeram Shete & Narhari Zirwal
Nashik Politics : ठाकरे गटाला मोठा धक्का ; आमदार सुहास कांदेंची ताकद वाढली..ठाकरेंच्या निष्ठावंतांचा शिवसेनेत प्रवेश

दिंडोरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रीराम शेटे यांचा शब्द अंतिम असतो. त्यातच तालुक्यातील बहुतेक सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला आलो आहोत.

-भास्कर भगरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

--

अजित पवारांसारख्या युवा नेत्यांमुळे राष्ट्रवादीला भविष्यात चांगला फायदा होईल. आज झालेल्या सभेसाठी काही लोक उघडपणे समोर आले नसले, तरी वेळेवर सर्व चित्र बदलेल.

-राजेंद्र उफाडे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com