Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar NCP : अजितदादांचं विधानसभेचं जागावाटप ठरलं! 54 फिक्स तर टार्गेट 'इतक्या' जागांचं

Ajit Pawar NCP Seat Sharing For Assembly Election 2024 : "आमची जागा वाटपा संदर्भात आणि इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे. आपल्याकडे सध्या असलेले आमदार आहेत तिथे आपल्याला काम करायचं आहे. त्या 54 जागा आपल्याला मिळतील."

Jagdish Patil

Mumbai News, 31 August : आगामी विधानसभेसाठी महायुतीचं जागावाटप कसं असणार? याबाबतची जाहीर चर्चा अद्याप झालेली नाही. मात्र, युतीतील घटक पक्षांकडून आपण किती जागा लढवणार याबाबत विविध दावे केले जात आहेत.

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्याला 54 जागा मिळतील, मात्र 60 जागांपर्यंत आपणाला काम करायचं आहे असं मोठं विधान केलं असल्याची माहिती सुत्रांनी साम टीव्हीला दिली आहे.

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असो वा महायुती दोन्हीकडील घटक पक्षांकडून जास्तीच्या जागांवर दावा केला जात आहे. शिवाय विद्यमान आमदारांना जागा सोडण्याच्या फॉर्मुल्यामुळे तर अनेक इच्छुकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता अनेक नेते तिकिटासाठी इतर पर्यायाचा विचार करत आहेत.

याचा सर्वाधिक फटका महायुतीला बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. युतीत जागांसाठी शिवसेना (Shivsena) शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अजित पवारांच्या विद्यमान आमदारांमुळे आधीच कागलमधील भाजपच्या समरजित घाटगेंनी तुतारी हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्याप्रमाणेच हर्षवर्धन पाटलांची वाटचाल असल्याच्या चर्चा आहेत. अशातच अजितदादांनी आपल्याकडे सध्या असलेले आमदार आहेत तिथेच आपल्याला काम करायचे आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे युतीतील जागावाटपाचा पेच आणखी वाढणार की काय? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

अजित पवार काय म्हणाले?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले, "आमची जागा वाटपा संदर्भात आणि इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे. आपल्याकडे सध्या असलेले आमदार आहेत तिथे आपल्याला काम करायचं आहे. त्या 54 जागा आपल्याला मिळतील तरी 60 मतदारसंघांमध्ये आपल्याला काम करायचं आहे. उरलेल्या जागांसदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल." तर दोन महिने इतर सर्व कामे बाजूला ठेवा आणि कामाला लागा, असे आदेशही दादांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT