Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सर्व नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी वाय. बी. सेंटर येथे पोहचले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंड केल्यानंतर सर्व मंत्र्यांसह पहिल्यांदाच शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. दरम्यान आज अचानक अजित पवार गटाचे सर्व मंत्री व नेते शरद पवारांच्या भेटीला पोहचल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा उधाण आले आहे. बंड केल्यानंतरही अजित पवार गटाचे शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Latest Marathi News)
अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याकडे गटाकडे बहुतांश आमदार गेले. अजित पवारांकडे आताच्या घडीला ३७ आमदारांचे समर्थन असल्याचे कळते, तर शरद पवार यांच्याकडे १६ ते १७ आमदारांचा पाठिंबा आहे. अजित पवार यांच्या गटाने पक्षात फुट पाडून आमदारांची फोडाफोडी केली, अशी भावना स्वत: शरद पवार यांनी व्यक्त केली होती. यामुळे लोकप्रतिनिधींच्या बाबतीत अजित पवारांचा गट तुल्यबळ ठरले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाल्यावर अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगितला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आपल्याकडेच राहिल आणि यापुढील निवडणुकाही घड्याळ पक्षाच्या चिन्हावर लढवणार, असे अजित पवार म्हणाले होते. पक्षाची लढाई निवडणुक आयोगाच्या दारातही पोहचले. अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघांकडूनही आपणच खरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत, असा दावा निवडणूक आयोगाकडे केले आहे.
दरम्यान, अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून अजित पवारांची ३० जुनच्या बैठकीत बहुमताने निवड करण्यात आली, असा दावा करण्यात आला. शरद पवार आता अध्यक्ष नसून अजित पवारच पक्षाचे प्रमख असल्याचा दावा अजित पवारांकडून करण्यात आला. मात्र या सर्व घडामोडीनंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीकडून पक्ष एकसंध ठेवण्याची भूमिका घेण्यात येत आहे.
दरम्यान पक्षामध्ये बंड केल्यानंतर अजित पवार गटाने शरद पवारांची यांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने अजित पवारां गटाचे आणि सत्ताधारी पक्षासोबत गेलेले नेते यांनी शरद पवारांची घेतलेली भेटीकडे पाहिले जात आहे. शरद पवारांच्या विचारांच्या विपरीत भूमिका घेऊनही शरद पवार यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून करण्यात आले होते. अजित पवार गटाचे भाजपबरोबर जाण्याचा शरद पवारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी नवा अजेंडा मांडला आहे.
अजित पवार गटातील नेत्यांची शरद पवार यांना घातलेले साकडे यावर शरद पवारांनी काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे अजित पवार गटाचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्या गटातील नेत्यांची भेटीची औपचारिकता संपल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले आहेत. येत्या काही दिवसात ते महाराष्ट्रभर दौरा करणार असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.