Hasan Mushrif on Sharad Pawar : शरद पवार काय त्यांच्याकडच्या नेत्यांबाबत शब्दही काढणार नाही ; मुश्रीफांचे सूचक विधान

olhapur Politics राज्यातील सत्तेत राष्‍ट्रवादीने जाण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतच्या घडामोडी सर्वांना माहित आहेत.
Hasan Mushrif on Sharad Pawar :
Hasan Mushrif on Sharad Pawar :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : शरद पवार हे काल, आज आणि उद्याही आमचे नेते आहेत. ते आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात तसेच त्यांच्यासोबत जिल्‍ह्यातील जे कार्यकर्ते गेले आहेत, त्यांच्या विरोधात कोणीही काहीही बोलू नये, असे आवाहन राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले.

जिल्‍हा राष्‍ट्रवादीच्या वतीने मार्केट यार्ड येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सर्वसामान्य रुग्‍णांचा आधार म्‍हणून सीपीआर हॉस्‍पीटलकडे पाहिले जाते. मात्र या दवाखान्याचे नाव घेतले की लोकं नाक मुरडतात. त्यामुळे येणार्‍या काळात या हॉस्‍पीटलचा पूर्णपणे कायापालट करण्यात येईल. हे हॉस्‍पीटल चकाचक करुन एवढ्या अत्याधुनिक सुविधा दिल्या जातील, की लोक खाजगी हॉस्‍पीटलमध्ये जाणे विसरतील अशी ग्‍वाहीही मुश्रीफ यांनी दिली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्‍हाधिकारी कार्यालयात जनता दरबार घेण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Hasan Mushrif on Sharad Pawar :
Sushma Andhare Notice To her Husband: सुषमा अंधारेंची विभक्त पतीला ५ कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; काय आहे प्रकरण?

हसन मुश्रीफ म्‍हणाले, राज्यातील सत्तेत राष्‍ट्रवादीने जाण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतच्या घडामोडी सर्वांना माहित आहेत. वैद्यकीय शिक्षण खात्याच्या माध्यमातून गोरगरीबांची पुन्‍हा एकदा सेवा करण्यास संधी मिळाली आहे. या विभागासह विशेष सहाय्‍य विभागाच्या माध्यमातून सीपीआरसह राज्यातील सर्व सरकारी रुग्‍णालये अत्यंत चांगली करुन दर्जेदार सेवा देण्यात येईल.

मागील सत्तेत मंत्री सतेज पाटील, मंत्री यड्रावकर यांच्यासोबत जनता दरबार घेण्याचा प्रयत्‍न केला. मात्र कोरोनामुळे त्यात अडचण आली. यापुढे हा दरबार पुन्हा सुरू करू.’ आमदार राजेश पाटील यांनी जिल्‍ह्यातून ४ ते ५ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून देण्याचे आवाहन केले.

Hasan Mushrif on Sharad Pawar :
Mansoon Session : अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेतेपदावरून पेच; काँग्रेस करणार दावा?

कागलकरांनी जास्‍त वेळ घेवू नये

जिल्‍ह्यात अजित पवार गटाची ताकत वाढणे आवश्यक आहे. यासाठी सर्व तालुक्यात फिरुन कार्यकतर्ांच्या भेटीगाठी घेणे आवश्यक आहे. मंत्री मुश्रीफ यांनीही सर्व तालुक्यातील लोकांना वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे कागलच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांचाजास्‍त वेळ घेवू नये, असा टोला जिल्‍हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी लगावला.

के.पीं.चा पाठिंबा

राधानगरी भुदरगडचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी शुभेच्‍छा देतानाच अजित पवार गटाला पाठिंबाही दिला आहे. खाजगी कामानिमित्त आजच्या मेळाव्याला ते उपस्‍थित नाहीत. मात्र त्यांनी काल पाठिंब्याची घोषणा केली असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com