Nawab Malik Sarkarnama
मुंबई

Praful Patel Meets Nawab Malik: नवाब मलिकांसाठी अजितदादा गटाची तगडी फिल्डिंग; प्रफुल्ल पटेलांसह मोठ्या नेत्यांनी घेतली भेट

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिकांना सशर्त जामीन मंजूर झाल्यानंतर ते सोमवारी तुरूंगातून बाहेर आले. त्यानंतर आज सकाळी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नवाब मलिक यांची त्यांच्या कुर्ला येथील नूर मंजिल या निवासस्थानी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

या भेटीत मलिक यांना अजित पवार यांच्या गटासोबत येण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचेही समजते. पण नवाब मलिक काय भूमिका घेणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मलिक तुरूंगातून बाहेर आले त्यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यादेखील तिथे उपस्थित होत्या. त्यानंतरही त्यांनी जवळपास चार तास त्यांच्या प्रक्रृतीची विचारपूस केली.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक या अजित पवारांच्या संपर्कात असल्याचीही माहिती आहे. नवाब मलिक यांना रुग्णालयातून इडीच्या ताब्यातून बाहेर काढण्यात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता नवाब मलिक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर नवाब मलिक हे तटस्थ राहतील अशीही चर्चा आहे.

याबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, नवाब मलिकांवर उपचार सुरू होते. आम्ही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा करण्यासाठी गेलो नव्हतो. आम्ही अनेक वर्ष सोबत काम केलं आहे. आपल्या जुन्या सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेलो होतो. नवाब मलिक यांना वैद्यकीय जामीन मिळाला आहे. ते आमचे सहकारी आहेत. त्यांना भेटणं आमचं कर्तव्य आहे. मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्याशी चर्चा करतील.

गेल्या दिड वर्षांपासून नवाब मलिक तुरुंगात होते. गोवावाला कंपाऊंड मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीने २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवाब मलिकांना अटक केली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनी मलिकांना ११ ऑगस्टला जामीन मंजूर झाला. नवाब मलिकां

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT