Maharashtra Political Crisis : शिवसेना-काँग्रेसचा राष्ट्रवादीला दे धक्का ; महाविकास आघाडी फुटणार?

Mahavikas Aghadi News : भाजपच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न असतानाच अजित पवार यांनी बंड केले
Maharashtra Political Crisis
Maharashtra Political Crisis Sarkarnama

Maharashtra Politics : मुंबईः अजित पवार-शरद पवार यांच्या पुण्यातील गुप्त भेटीने महाविकास आघाडीला तडे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संशयाच्या राजकारणाकडे बोट दाखवत आघाडीतून मित्रपक्ष शिवसेना आणि कॉंग्रेस फारकत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीला बाजूला ठेवून ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र लढण्याची शक्यता असून त्यादृष्टीने दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.

भाजपच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न असतानाच अजित पवार यांनी बंड केले. ते भाजपसोबत सत्तेत सामील झाले. त्यामुळे आघाडीला मोठा धक्का बसला.त्यातून राष्ट्रवादीसोबत शिवसेना आणि काँग्रेसमध्येही अस्वस्थता पसरली आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या.

Maharashtra Political Crisis
Narendra Modi Independence Day : पीएम मोदींचे स्वातंत्र्यदिनानिमित्त आतापर्यंतचे खास 'लूक'

त्यानंतर भाजपविरोधात लढण्याचा पवित्रा त्यांनी कायम ठेवला. मात्र काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि शरद पवारांची भेट झाली. त्यावर खुद्द शरद पवारांनीच खुलासा केला. तरीही शिवसेना आणि काँग्रेस नेते राष्ट्रवादीच्या राजकारणाकडे संशयाने पाहत आहे.आगामी निवडणुकांत राष्ट्रवादीला सोबत घेण्यात अडचण निर्माण होऊ शकतो. हे हेरून शिवसेना आणि काँग्रेस नेते एकत्र येऊ पाहत आहेत. त्यातून नवे राजकरण घडवत पुढील निवडणुकांत शिवसेना आणि काँग्रेस ताकदीने लढण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतच नवे राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

दोन दिवसांपूर्वी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौकातील प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अजित पवार हे कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या बंगल्यावर गेले. याच ठिकाणी अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची बातमी समोर आली. तेव्हापासून

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com