akshay shinde.jpg sarkarnama
मुंबई

Akshay Shinde Encounter Case Update: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर 'फेक'? वडिलांनी उचललं मोठं पाऊल

Deepak Kulkarni

Badlapur News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे.

विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. तसेच अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) एन्काऊंटर बनावट असल्याचेही बोलले जात आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या वडिलांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.या याचिकेत अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट दावा करण्यात आला आहे.तसेच उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली याप्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.

अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरचे राजकीय लाभार्थी कोण? असा गंभीर सवालही या याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेत एन्काऊंटरच्या राजकीय लाभार्थ्यांच्या करण्यात यावी असंही म्हटलं आहे. अक्षय शिंदेंच्या एन्काऊंटरसह चिमुरड्यांवरील लैंगिक अत्याचाराची देखील नव्याने चौकशी करण्यात यावी अशी मागणीही याचिकेद्वारे अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी केली आहे.

दोघा फरार आरोपींवर देखील याचिकेत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठांसमोर बुधवारी तातडीने सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बदलापूर (Badlapur) लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी (ता.24)मुंब्रा परिसरात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत एका पोलिस कर्मचाऱ्यावर गोळी झाडल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

बदलापूर चिमुरडींवरील अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास येथे पोलिसांनी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटरनंतर सत्ताधारी महायुती सरकारमधील शिवसेनेसह इतर पक्षांनी या कारवाईचं समर्थन केलं.तसंच पोलिसांच्या कारवाईचं जोरदार कौतुकही केलं आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करत महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

पोस्टमार्टेम अहवालात काय...?

या घटनेवरून विरोधकांनी सरकार टीका सुरू केली आहे, तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय आता या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीकडूनही चौकशी सुरू आहे. दरम्यान अक्षय शिंदेचा(Akshay Shinde) पोस्टमार्टम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल) आला आहे. ज्यातून त्याचा मृत्यू हा अतिरक्तस्रावाने झाला असल्याचे समोर आले आहे.

जवळपास सात तास पाच डॉक्टरांची टीम अक्षयचं शवविच्छेदन करत होती. ज्यामध्ये अक्षयच्या डोक्यालाही एक गोळी लागल्याचं दिसून आलं आहे. एवढच नाहीतर या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले गेले आहे. आता प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द केला गेला आहे. अतिरक्तस्त्रावाने अक्षयचा मृत्यू झाल्याचे म्हटले गेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT