Akshay Shinde Postmortem Report : ...अखेर अक्षय शिंदेचा 'पोस्टमार्टम रिपोर्ट' आला समोर; मृत्यूचं नेमकं कारणही उघड!

Akshay Shinde Encounter: जवळपास सात तास पाच डॉक्टरांची टीम अक्षय शिंदेचं शवविच्छेदन करत होती; मृतदेह सध्या कळवा रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे.
akshay shinde
akshay shindesarkarnama
Published on
Updated on

Akshay Shinde Encounter case Update : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचं सोमवारी एन्काऊंटर झालं. पोलिसांची बंदूक हिसकावून त्याने तीन गोळ्या झाडल्या होत्या, त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्या ज्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे.

विरोधकांनी या घटनेवरून सरकार टीका सुरू केली आहे, तर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय आता या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीकडूनही चौकशी सुरू आहे. दरम्यान अक्षय शिंदेचा(Akshay Shinde) पोस्टमार्टम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल) आला आहे. ज्यातून त्याचा मृत्यू हा अतिरक्तस्रावाने झाला असल्याचे समोर आले आहे.

akshay shinde
Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेचा 'एन्काऊंटर' कसा झाला? पोलिसांनी सांगितली A टू Z स्टोरी

जवळपास सात तास पाच डॉक्टरांची टीम अक्षयचं शवविच्छेदन करत होती. ज्यामध्ये अक्षयच्या डोक्यालाही एक गोळी लागल्याचं दिसून आलं आहे. एवढच नाहीतर या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले गेले आहे. आता प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द केला गेला आहे. अतिरक्तस्त्रावाने अक्षयचा मृत्यू झाल्याचे म्हटले गेले आहे.

akshay shinde
Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर 'एन्काऊंटर'पूर्वी नेमकं काय घडलं

दुसरीकडे या प्रकरणातील अन्य आरोपींना अटक केल्याशिवाय अक्षयचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे अक्षयचा मृतदेह सध्या कळवा रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com