Akshay Shinde encounter Update : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी आणि एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र लिहिले आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात आहे. तसेच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असल्याचाही आरोप केला गेला आहे.
अण्णा शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात, अमित शाह(Amit Shah) यांच्याकडे स्वतःचे कुटुंब आणि वकील अमित कटारनवरे यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे किरीट सोमय्या यांना संरक्षण दिले आहे त्यापेक्षा जास्त संरक्षण आम्हाला द्यावे, कारण किरीट सोमय्या यांच्या पेक्षा जास्त धोका आम्हाला सत्ताधारी, माफिया आणि त्यांच्या चेले चपाट्या कडून आहे, असे पत्रात सांगून संरक्षणाची मागणी केली आहे.
तसेच हे प्रकरण झाल्यानंतर आम्हाला तसेच आमच्या वकिलांना धमक्या येत आहेत, अक्षय शिंदे याचा खून राजकीय फायद्यासाठी करण्यात आल्याचे देखील या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या(Akshay Shinde) वडिलांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेत अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट दावा करण्यात आला आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली याप्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
अक्षयच्या 'एन्काऊंटर'नंतर त्याच्या आई-वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती मोहिते-ढेरे यांनी पोलिसांच्या भूमिकेवरून सरकारी वकिलाला प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.