Sharad Pawar Cancel All Tours : राष्ट्रवादी काँग्रेसमधून फारकत घेत अजित पवार रविवारी ( २ जुलै) भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सामील झाले. त्यांनी आणि त्यांच्या काही समर्थक आमदारांनी मंत्री पदाची शपथही घेतली. त्यानंतर यावेळी त्यांनी पक्षसंघटना बांधणीसाठी राज्यभरात दौरे करणार असल्याचे जाहीर केले. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार शरद पवारांचे सर्व दौरे तुर्तास रद्द करण्यात आले आहेत. पण उत्तर येवल्यातील सभा होणार असल्याच सांगण्यात येत आहे.
पण राज्यातील पावसाळी वातवरणामुळे हा दौरा तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीतील फूटीनंतर शरद पवार यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. पक्षसंघटना बांधणीसह कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना हा दौरा आखला होता. पण सध्या राज्यातील पावसाच्या वातावरणामुळे सध्या त्यांचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहेत. त्यांच्या दौऱ्याचे सर्व पूर्वनियोजन केल्यानंरच माध्यामांना माहिती दिली जाईल, असं राष्ट्रवादीकडून कळवण्यात आले आहे. (NCP)
अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार भाजप-शिंदे गटासोबत सरकारमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादीत मोठी फूट पडली. या फुटीमुळे कार्यकर्त्यांचेही मनोबल खचले आहे. पण पक्षाला पून्हा नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. उत्तर महाराष्ट्रातून त्यांनी या दौऱ्याचे नियोजन केले होते. नाशिक, धुळे, जळगाव याठिकाणी त्यांच्या सभा होणार होत्या. पण परंतु येवल्याची सभा वगळता पुढील दौरा रद्द करण्यात आला आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.