Ajit Pawar News  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Deputy CM : अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांचा आकडा समोर; विधानसभेचे 40 तर विधानपरिषदेचे...

Ajit Pawar Oath Ceremony : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीलाही त्याच पद्धतीने धक्का बसला आहे.

मृणालीनी नानवडेकर

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवार यांना विधान सभेतील 40 आमदारांचा आणि विधान परिषदेतील 6 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अजित पवार यांना एकून 46 आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांना असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादीलाही त्याच पद्धतीने धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आणि अपक्ष 10 अशा 50 आमदारांचा पाठिंबा होता. त्यानंतर अजित पवार यांनाही 46 आमदारांचा पाठिंबा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे हसन मुश्रीफ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष करुन दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ तसचे हसन मुश्रीफ यांच्या शपथविधीमुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. हे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसेच यामध्ये प्रफुल्ल पटेल हेही सहभागी आहेत.

आज सकाळपासून अजित पवारांच्या देवगीरी बंगल्यावर समर्थक आमदारांची बैठक सुरू होती. अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप घडला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी द्या, अशी मागणी केली होती. त्यानंतर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते, ''महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलने झाले आहे. ते म्हणाले, मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरे सह पुन्हा सर्व नव्याने उभे करु, होय, जनात हे खेळ फार काळ सहन करणार नाही, असे ट्वीट राऊत यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT