Eknath Shinde on Ajit Pawar : अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "अजितदादांनी नेहमीच ...

Maharashtra Politics : आता डबल इंजिन सरकारला ट्रीपल इंजिन जोडलं गेलं आहे.
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या एन्ट्रीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे माध्यमांशी बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, "राज्यात विकासाचे राजकारण होत आहे. अजित पवारांनी कायम विकासाचं राजकारण केलं आहे. आता डबल इंजिन सरकारला ट्रीपल इंजिन जोडलं गेलं आहे,"

राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 35 आमदार अजित पवारांसह राजभवनात हजर आहेत. अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि इतर 9 आमदारही मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. अजित पवार आता सरकारमध्ये सामील झाले आहेत. काही दिवसा पूर्वी 'जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार," अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली होती.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Ajit Pawar Deputy CM: विरोधीपक्षनेताच सत्तेत सहभागी ; उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार..

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम, नीलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील आणि सरोज अहिरे उपस्थित होते. यापैकी नऊ जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अजित पवार यांच्या बंडामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यातील विरोधीपक्षनेताच थेट सत्तेत सहभागी झाला आहे.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar
Maharashtra Politics : शिवसेनेनंतर राष्ट्रवादीही फुटली, अजितदादांसोबत ३५ आमदार : नऊ आमदार मंत्री होणार..

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अडीच वर्षांपूर्वी जाऊन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र दीड दिवसांतच शरद पवार यांच्यासोबत ते आले आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सध्या उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस देखील आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. त्यांची वर्णी केंद्रामध्ये लागणार का? याची देखील चर्चा आहे.

अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचा शपथविधी राजभवनावर राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीमध्ये झाला आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे, सुनील तटकरे देखील राजभवनात दिसले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com