Ambarnath Municipal Council amid political turmoil as Congress and NCP corporators face disqualification over alleged defection and support to BJP, with the district administration set to decide. Sarkarnama
मुंबई

Congress corporators : काँग्रेससोबत दगाबाजी केलेल्या 16 नगरसेवकांचं पद धोक्यात : भाजपला दिलेला पाठिंबा अंगलट येणार?

Ambarnath Municipal Council : अंबरनाथ नगरपालिकेत कथित पक्षांतरामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या 16 नगरसेवकांचे पद धोक्यात असून, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय सत्तासमीकरण बदलणारा ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ambarnath political crisis : अंबरनाथ नगरपालिकेतील सत्तासंघर्षाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे. कथित पक्षांतर प्रकरणामुळे काँग्रेसचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार अशा एकूण 16 नगरसेवकांचे पद धोक्यात आले आहे. या प्रकरणावर 9 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या निर्णयाकडे शहराचे लक्ष लागले आहे. यामुळे राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्तेसाठी काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे कथित व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मात्र, संबंधित नगरसेवकांनी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नसून अपक्ष म्हणूनच कार्यरत असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या भूमिकेला विरोधकांकडून तीव्र आव्हान देण्यात येत असून, हा वाद थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी पोहोचला.

या प्रकरणाची सुनावणी 28 जानेवारीला होणार होती; मात्र अजित पवार यांच्या निधनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर 9 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली असून, त्या दिवशी होणारा निर्णय अंबरनाथच्या सत्तासमीकरणांची दिशा ठरवणारा ठरणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) चे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील आणि त्यांच्या सोबतच्या 3 नगरसेवकांची भूमिका कोणत्या बाजूला झुकते, याविशेष लक्ष लागले आहे.

9 फेब्रुवारीला जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कोणत्याही बाजूने गेला, तरी हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयात जाण्याची दाट शक्यता आहे. राजकीय पेचामुळे नगरपालिकेतील विषय समिती सभापतींच्या निवडणुका रखडल्या आहे. सर्वसाधारण सभा घेणेही शक्य झालेले नाही. परिणामी, अनेक विकासकामे ठप्प पडली असून नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.

रायगड प्रकरणाचा परिणाम

अंबरनाथ विकास आघाडी (भाजप व इतर) आणि शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातील गटनोंदणीचा वादही अद्याप निकाली निघालेला नाही. हे प्रकरण यापूर्वी उच्च न्यायालयात गेले होते; मात्र न्यायालयाने ते पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी पाठवले आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत पक्षांतर करणाऱ्या 7 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय झाल्याने अंबरनाथमधील प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT