Navi Mumbai Mayor : नवी मुंबईच्या महापौरपदी सुजाता पाटील; शिंदेंची माघार, नाईकांची रणनीती यशस्वी!

Sujata Patil Mayor BJP : नवी मुंबई महापौर निवडणूक बिनविरोध झाली. एकनाथ शिंदेंच्या उमेदवारा सरोज पाटील यांनी माघर घेतली.
Sujata Patil Mayor Navi Mumbai
Sujata Patil Mayor Navi Mumbaisarkarnama
Published on
Updated on

Navi Mumbai Mayor News : महापालिका निवडणुकीत नवी मुंबईची निवडणूक विशेष गाजली. मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये या निवडणुकीच्या निमित्ताने आरोप प्रत्यारोप झाले. शिंदेंनी ताकद लावली मात्र नाईकांनी पुन्हा नवी मुंबईचे बाॅस आपणच हे दाखवून देत सत्ता मिळवली.

नवी मुंबईच्या 111 जागांपैकी तब्बल 66 जागांवर भाजपने विजय मिळवला तर, शिंदेंच्या शिवसेनेला 24 जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, त्यांच्याकडून महापौर पदाची निवडणूक लढण्याची घोषणा करत नाईकांना डिवचण्यात आले.

भाजपने महापौर पदासाठी सुजाता पाटील यांना उमेदवारी दिली तर शिंदेंच्या शिवसनेकडून सरोज पाटील यांनी अर्ज दाखल केला. महापौर पदासाठी निवडणूक होणार हे निश्चित मानले जात असताना एकनाथ शिंदेंच्या उमेदवार सरोज पाटील यांनी माघार घेतली. त्यांनी आपला अर्ज आज मागे घेतला. त्यानंतर सुजाता पाटील यांची महापौर पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

Sujata Patil Mayor Navi Mumbai
Baramati Politics: 'माईं' ते 'वहिनी'; ६४ वर्षांनंतर महिलेच्या हाती धुरा! बारामतीत इतिहासाचे वर्तुळ पूर्ण होणार?

उपमहापौर पदी दशरथ भगत

महापौर पदी सुजाता पाटील यांच्या निवडीनंतर उपमहापौर पदी दशरथ भगत यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर पाटील आणि भगत यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान, निवडीनंतर आपल्या कार्यालयात जात सुजाता पाटील यांनी कार्यभार स्वीकारला.

Sujata Patil Mayor Navi Mumbai
Maharashtra Government : सरकारी कार्यालयात चाललाय, मग ही बातमी वाचाच; फडणवीसांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचं वाढवलं टेन्शन...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com