MNS Yusuf Shaikh Sarkarnama
मुंबई

MNS News : मनसेच्या शहर संघटकाने केली गो हत्या? भावानेच पोलिसांना दिला पुरावा

Ambernath MNS News : हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या मनसेचा अंबरनाथमधील शहर संघटक असलेल्या युसूफ शेखवर गो हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे युसूफचा भाऊ जलालूद्दीन शेख यानेच त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Dombivli News, 25 Dec : हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या मनसेचा (MNS) अंबरनाथमधील शहर संघटक असलेल्या युसूफ शेखवर (Yusuf Shaikh) गो हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे युसूफचा भाऊ जलालूद्दीन शेख यानेच त्याच्या विरोधात तक्रार दिली आहे.

जलालूद्दीन तक्रारीवरून अंबरनाथ पोलिस ठाण्यात (Ambernath Police Station) युसूफवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मनसेचा (MNS) जुना झेंडा असलेल्या गाडीतून तो गोमांसची वाहतूक करत असल्याचं त्याने या तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलालूद्दीन याने अंबरनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी त्याने पोलिसांना पुरावा म्हणून एका पेन ड्राईव्ह दिला आहे. ज्यामध्ये काही फोटो आणि व्हिडिओ आहेत. याती एका व्हिडिओत युसूफ हा वुलन चाळ येथील एका रुममध्ये उभा असुन त्याचे साथीदार गोवंशीय जनावरे कापत असल्याचं दिसत आहे.

तर दुसऱ्या व्हिडिओत एका मोकळ्या जागेत गोवंशाची कापून ठेवलेली डोकी दिसत आहेत. या गोवंशांचं मांस एका कारमध्ये ठेवताना दिसत असून ही गाडी युसूफचीची असल्याचं एफआयआरमध्ये लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे जलालूद्दीन याच्या तक्रारीनुसार युसूफ व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे याच गाडीवर मनसेचा जुना झेंडा सुद्धा आहे. युसूफ शेख याचा अनेक वर्षांपासून गोमांस विक्रीचा धंदा असून यापूर्वी देखील त्याच्यावर गोहत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी पक्षानं त्याच्यावर काहीही कारवाई केली नव्हती. पण आता राज ठाकरेंनी (Raj Thackeray) घेतलेली हिंदुत्त्ववादी भूमिका पाहता मनसेची युसूफवर नाराजी असून त्याच्यावर पक्ष काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT