Ajit Pawar Power in Maharashtra Sarkarnama
मुंबई

Ambernath Politics : सत्तेच्या जवळ राहण्यासाठी अजित पवारांकडे आलो, शहराध्यक्षाची जाहीर कबुली

NCP Politics Ajit Pawar Sadashiv Patil : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांना फोडत आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Sadashiv Patil News : बाजुला राहून कामे होत नव्हती, त्यामुळे नुकसान होत होते. इतर पक्षात जाण्याऐवजी सत्तेच्या जवळ राहण्यासाठी आपल्याच घरात, अजित पवार गटात येण्याचा निर्णय घेतला, असे स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी अंबरनाथ (पूर्व) येथील पत्रकार परिषदेत केले.

सदाशिव पाटील हे गेली २० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. पक्षात फूट पडल्यानंतर ते शरद पवारांसोबत राहिले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून लगेचच अंबरनाथ शहराध्यक्षपदी नियुक्ती मिळवली.

अजित पवारांना साथ देण्याच्या आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट पाटील म्हणाले, “राजकारणात विकासासाठी सत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे सत्तेच्या जवळ राहून काम करण्याचा निर्णय योग्य वाटला. अंबरनाथ शहरात कोणताही दुजाभाव न ठेवता, सर्वांना सोबत घेऊन प्रेमाने काम करणार आहे. वरिष्ठांचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. त्याचबरोबर त्यांनी आपली सून अश्विनी सचिन पाटील या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचेही जाहीर केले.

दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी अश्विनी पाटील यांचे नाव पुढे केल्याने युतीच्या चर्चेला आणखी बळ मिळाले असून, अंबरनाथच्या राजकारणात आगामी काळात नवे समीकरण आकार घेणार असल्याचे चित्र दिसत आहे. पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळी, किसनराव तारमळे, आप्पा मालुसरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आगामी निवडणुकांपूर्वी नव्या युतीची चर्चा

सदाशिव पाटील यांच्या प्रवेशामुळे अंबरनाथच्या राजकारणात नव्या घडामोडींचा संकेत मिळत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस युतीची शक्यता राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. भाजपचे राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले पाटील यांनी पाटील यांची भेट घेऊन अभिनंदन केले. भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील यांनीही “दोन्ही पक्ष युतीबाबत सकारात्मक आहेत,” असे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT