Jitendra Awhad, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad News : महत्वाकांक्षी मुख्यमंत्री उद्या म्हणतील मला पंतप्रधान व्हायचं; आव्हाडांची शिंदेंवर खोचक टीका

Advertisement of Shivsena : जाहिरातीतून उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा अपमान

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics on Advertisement : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह मंगळवारी (ता. १३) एक जाहिरात झळकली. त्यात 'राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' या घोषवाक्य होते. तसेच मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे यांना जनतेची पसंती असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे भाजपच्या गोटात एकदम शांतता पसरली. या जाहिरातीमुळे युतीत बेबनाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे ही जाहिरात आम्ही दिली नसल्याचे वारंवार शिवसेनेकडून सांगितले होते. (Latest Marathi News)

या जाहिरातीवरून महाविकास आघाडीकडून शिवसेनेवर (शिंदे गट) (Shivsena) सडकून टीका केली. या जाहिरातीवरून सारवासारव करताना शिंदे गटाची पुरती दमछाक झाली. त्यानंतर आज बुधवारी (ता. १४) पुन्हा दुसरी जाहिरात झळकली आहे. या जाहिरातीतून युतीतील बेबनाव टाळण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील (MVA) नेत्यांकडून केला जात आहे. सलग दोन दिवस आलेल्या जाहिरातीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.

यावेळी आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महत्वाकांक्षा खूप मोठी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, कालची जाहिरात म्हणजे नवे काही नव्हते. हे आज ना उद्या होणारच होते. ठाण्यात काम करताना त्यांच्या वागण्याचा अनुभव ठाण्यात वारंवार घेतला आहे. मात्र ज्या माणसाने आपल्या बोटाला धरून या पदापर्यंत आणले त्या माणसाची एवढी अवहेलना करणे हे शोभत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी महत्वकांक्षा खूप मोठी आहे. ते उद्या म्हणतील की मला पंतप्रधान व्हायचे आहे."

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी आजच्या जाहिरातीचा सरड्याप्रमाणे रंग बदल्याचे सांगितले. ते म्हणाले, कालच्या जाहिरातीचा मजकूर आणि फोटो काही वेगळेच सांगत होते. त्यानंतर शिंदे यांनी दिलेल्या आजच्या जाहिरात वेगळे सांगत आहे. हे सगळे रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहे. असे करताना त्यांना काहीच वाटत नाही. मात्र अख्खा महाराष्ट्र हे पाहत आहे. आज एक जाहिरात येते, उद्या एक जाहिरात येते. यातून त्यांची पॉलिटिकल 'क्रेडिबिलिटी' आणि बौद्धिक 'क्रेडिबिलिटी' शून्य झाली आहे.

यावेळी आव्हाड यांनी शिंदेंनी फडणवीसांचा अपमान केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, "ज्या माणसाने बोट धरून मोठे केले त्यांचा अशा प्रकारे अपमान केला. दरम्यान, राज्यात सत्तांतर फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे घडल्याचे शिंदे बोलत होते. हे सगळं हास्यास्पद आहे. विधानसभेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सांभाळून घेतात. फडणवीस नसेल तर सभागृह चालू शकत नाही. मात्र त्यांना अशा प्रकारे कोंडीत पकडणे, महाराष्ट्रात उलटा पालटा करणे चुकीचे आहे. मंत्रालयात गेले की बघा कसा हसा होतो."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT