Rohit Pawar News : रोहित पवारांचा शिवसेनेवर निशाणा अन् भाजपला चिमटा; म्हणाले, 'इजा कानाला नव्हे तर..."

State Government : जाहिरातीमुळे भाजप दुखावल्याचा महाविकास आघडीचा दावा
Rohit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Rohit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on: 
Updated on: 

राजेंद्र त्रिमुखे

Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसह मंगळवारी (ता. १३) विविध वृत्तपत्रात झळकलेल्या जाहिरातीमुळे राज्यात एकच गोंधळ उडाला. या जाहिरातीवरून महाविकास आघाडीकडून शिवसेनेवर (शिंदे गट) सडकून टीका केली. दरम्यान, भाजपच्या गोटात कमालीची शांतता पसरली होती. तर या जाहिरातीवरून सारवासारव करताना शिंदे गटाची पुरती दमछाक झाली. त्यानंतर आज बुधवारी (ता. १४) पुन्हा दुसरी जाहिरात झळकली आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारला लक्ष्य केले. (Latest Marathi News)

'राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे' या घोषवाक्यासह मंगळवारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्यापेक्षा शिंदे यांना जनतेची पसंती असल्याचा दावा करण्यात आला होता. या जाहिरातमुळे महाविकास आघाडीकडून राज्य सरकारवर टीका केली. दरम्यान, ही जाहिरात आम्ही दिली नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनी वारंवार सांगितले. तसेच युतीत कुठलाही बेबनाव नसल्याचे सांगताना शिवसेनेची दमछाक झाली. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी पुन्हा दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Rohit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ahmednagar Politics : राष्ट्रवादीचे शेलार थेट हैदराबादेत; 'बीआरएस'मध्ये प्रवेशाची चर्चा !

या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राज्यातील विकासकामांची झलक दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच पंतप्रधान मोदी, आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्याचे फोटो झळकले आहेत. कालच्या जाहिरातीतील चुका आजच्या जाहिरातीतून सुधारण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाल्याची टीका आता महाविकास आघाडीकडून होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मात्र शिवसेनेला लक्ष्य करून भाजपला चिमटा काढला आहे. याबाबत रोहित पवारांनी एक ट्विट केले आहे.

सलग दोन दिवसांच्या या जाहिरात नाट्यावरून महाविकास आघाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना दिसत आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिवसेनेला डिवचून भाजपला चिमटा घेतला आहे. आपल्या सोशल मीडिया हँडलमध्ये आमदार रोहित पवार यांनी काल आणि आज वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली जाहिरातही पोस्ट केल्या आहेत. ते म्हणाले, "इजा 'कानाला' झालेली नव्हती तर 'मनाला' झालेली होती. मनाला झालेली इजा परवडणारी नव्हती. यातूनच आज पुन्हा नवीन जाहिरात दिली असावी."

Rohit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Ahmednagar Politics: अपर जिल्हाधिकारी कार्यालय तर झालं; जिल्हा विभाजनाचं काय ?

पवार यांनी नंतर राज्य सरकारचा (State Government) चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, "सरकारने कामे केली असती तर जाहिरातीतून ढोल वाजवण्याची वेळच आली नसती. त्यातही जाहिरातीच्या मांडणीवरूनच इतका गोंधळ असेल तर सरकार चालवताना किती असेल? यामुळेच राज्यात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. यांच्या काही नेत्यांना पदे मिळाली पण सामान्य नागरिक मात्र अडचणीत आला. सरकार जाहिरातीतच दिसते. बेरोजगारांनी नोकरी आणि भाकरीऐवजी यांच्या जाहिरातीच पाहत बसायचं का?

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.