Mumbai BJP New President: मुंबई महापालिका जिंकायचीच, असा चंग बांधलेल्या भाजपने मुंबईत संघटनात्मक बदल केले आहेत. भाजप मंत्री आशिष शेलार यांच्याकडे असलेली मुंबईच्या संघटनेची जबाबदारी होती. परंतु आगामी महापालिका निवडणुकीमुळे संघटनेच्या विस्तारासाठी कोअर कमिटी आणि वरिष्ठांनी आमदार साटम यांच्याकडे मुंबई शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आमदार साटम यांनी पदाची सूत्र स्वीकारली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही महायुती मुंबई जिंकणारच, असा पुनरुच्चार केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आमदार साटम यांच्याकडे सूत्र दिल्यानंतर माध्यमांशी संवास साधला. ते म्हणाले, "आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईत पक्ष संघटनेची चांगली धुरा संभाळली. विधानसभा निवडणुकीत मंत्री आशिष शेलार यांनी भाजप मुंबईतील नंबरचा एक पक्ष केला. आशिष शेलार यांच्याकडे आा मंत्रिपदाचा भार आहे. त्यामुळे कोअर कमिटी सदस्य आणि वरिष्ठांची चर्चा करून आमदार अमित साटम यांच्याकडे मुंबईतील संघटनेची जबाबदारी दिली."
'आमदार साटम तीनवेळा आमदार अन् नगरसेवक म्हणून देखील काम केलं आहे. भाजपमध्ये प्रदीर्घ असा कार्यकाळ त्यांनी घालवला आहे. संघटनात्मक अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. विधानसभेत एक अभ्यासू अन् आक्रमक, असा प्रकारचे आमदार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. मुंबईच्या (Mumbai) समस्यांची जाण, तो सोडविण्यासाठी कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये मुंबईमध्ये घोडदौड राखेल,' असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
'मुंबई महापालिकेत महायुतीचीच सत्ता येईल, याचा विश्वास व्यक्त करताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे पार पाडतील. मुंबई, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबईत नवीन रेकाॅर्ड तयार करतील,' असेही म्हटले.
मत चोरीच्या मुद्यावर CM देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा प्रतिक्रिया देताना, 'काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टार्गेट केलं. राहुल गांधी हे सिरियल लायर आहेत. ते नेहमीच खोटं बोलतात. महाराष्ट्रातील नेत्यांना देखील तिच स्वप्न पडू लागले आहेत. राहुल गांधी खोटं बोलू लागले आहे. त्यांच्या खोट्यात हे देखील खोटं बोलू लागलं आहेत.
पण खोटं टिकत नाही, ते वाहून जातं. ढासळतं. पण त्यांना माहिती नाही की, जनतेत जाऊन मत जिंकायला लागतात. जोपर्यंत हे जनतेत जात नाहीत, तोपर्यंत हे असेच स्वतःला समजवत राहणार. दिल को बहलाने के लिए गालिब यह ख्याल भी अच्छा है, एवढं मी सांगेल,' असा टोला लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.