Mahayuti twist : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीबाबत मोठा ट्विस्ट; एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत

Maharashtra municipal elections News : महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार की स्वबळ अजमाविणार? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिवाळीनंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी तयारीला सुरु केली असतानाच दुसरीकडे मात्र वेगवान घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित निवडणुका लढणार की स्वबळ अजमाविणार? याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

त्यातच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीबाबत मोठा ट्विस्ट पाहण्यास मिळत असून नाशिक महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या ठिकाणी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्याची चाचपणी करीत असल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी महायुती एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे जाहीर केले आहे. विशेषतः मुंबई महापलिकसह सर्वत्र महायुती एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी काही ठिकाणी काही ठिकाणी मतभेद असतील तिथे मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, मात्र महायुती हाच आमच्यासाठी पहिला पर्याय असेल, असे स्पष्ट केले होते. मात्र, महायुतीच्या काही नेत्यांकडून स्वबळाची चाचपणी केली जात असल्याचे पुढे आले आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sanjay Raut on BJP : "फडणवीस अर्धवट ज्ञानी, गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही"; जावेद मियाँदादच्या मातोश्री भेटीची आठवण करून देताच राऊत भडकले, भेटीचा तपशीलच सांगितला

येत्या काळात नाशिक महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) स्वबळाची चाचपणी केली जात आहे. नाशिकमध्ये रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. बैठकीदरम्यान प्रत्येक जागेसाठी तयारी असली पाहिजे, अशा सूचना दादा भुसे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Fadnavis on Raj Thackeray : युतीबाबत फडणवीसांकडून एक घाव दोन तुकडे; राज ठाकरेंसोबत जाण्याच्या चर्चेवर मोठे विधान, म्हणाले...

त्यासोबतच या बैठकीवेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीचा गण असेल, महापालिकेचा वार्ड असेल प्रत्येक ठिकाणी उमेदवार तयार असला पाहिजे, अशा सूचना कार्यकर्त्याना दिल्या आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीत नाशिक महापालिका, नाशिक जिल्हा परिषदेवर 100 टक्के भगवा फडकवू असे दादा भुसे म्हणाले. त्यामुळे भुसे यांनी केलेल्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गट महापालिकेसाठी स्वबळाची चाचपणी करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
CM Fadnavis reaction: मनोज जरांगे यांच्या मोर्चावर सीएम फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'त्यांच्या मागण्या...'

चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. स्थानिकांची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक असल्याने सर्व कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Uddhav- Raj Thackeray : उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार! निमंत्रण मिळालं, कारणही आहे खास!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com