Amey Khopkar  
मुंबई

ED ने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली: मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं

BJP-Shivsena dispute| MNS| राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंबंधी राज्य सरकारला थेट आवाहन केलं होतं

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाईमुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. असे असतानाच काल ईडीने शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली. त्यामुळे हा वाद आता टोकाला जाणार असल्याची शक्यताही निर्माण झाली आहे. हीच संधी साधत मनसे (MNS) नेते अमेय खोपकर यांनीही शिवसेनेला डिवचले आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट करत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. “मशिदींच्या भोंग्यावर कारवाई करायला सांगितले होते, ईडीने थेट राष्ट्रवादीच्या भोंग्यावरच कारवाई केली,” असं ट्विट करत खोपकरांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

गुडीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासंबंधी राज्य सरकारला थेट आवाहन केलं होतं. तसे न आम्ही मशिदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालीसा लावू असा इशाराही दिला होता. त्याचाच संदर्भ देत खोपकरांनी संजय राऊतांचा राष्ट्रवादीचा भोंगा असा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला आहे.

तर दूसरीकडे राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या भाषणातील मशिंदीवरील भोंग्यांबाबत मनसे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी दादरमधील शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला आहे. "उद्धव ठाकरे हिंदू असून हनुमान चालीसा बोलायला बंदी घालतात, भोंगे काढतात असं म्हणत बाळासाहेब आपला ठाकरी बाणा आणि वारसा खऱ्या अर्थाने राज साहेब ठाकरे चालवत आहेत, जमल्यास उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी द्या" अशा आशयाचे पोस्टर्स मनसैनिकांनी सेनाभवनासमोर लावल्याने आता शिवसेना-मनसे वाद पेटण्याचीही चिन्हे निर्माण झाली आहे. यावर शिवसेना काय पाऊल उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT