शिवसेना नेत्यांच्या सत्काराला शिर्डीहून मागविला हार!

रिक्षा चालकांच्या समस्या सोडविल्याने संघटनेतर्फे सत्कार केला.
Rickshaw owners facilitate Shivsena leaders.
Rickshaw owners facilitate Shivsena leaders. Sarkarnama
Published on
Updated on

धुळे : रिक्षाचालकांचे (Rikshaw Organisation) विविध प्रश्‍न हाताळल्याने वंदे मातरम जिल्हा रिक्षा चालक- मालक संघटनेतर्फे शिवसेनेच्या (Shivsena) येथील पदाधिकाऱ्यांचा मंगळवारी मोठ्या उत्साहात सत्कार झाला. त्यासाठी रिक्षा चालक संघटनेने शिर्डी (Shirdi) येथून खास हार मागविला होता. त्यामुळे हा सत्कार चर्चेचा विषय ठरला.

Rickshaw owners facilitate Shivsena leaders.
...यामुळेच दीपक पांडेंना शासनाने दोन वेळा निलंबित केले!

रिक्षा संघटनेने सांगितले, की आरटीओ कार्यालयातर्फे पंधरा वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षांवर जप्तीसह स्क्रॅपची कारवाई केली जात आहे. याविरोधात शिवसेनेच्या महानगर शाखेने पीडित रिक्षाचालक व मालकांची उदरनिर्वाहाची समस्या प्रखरतेने हाताळली. शिवसेनेने आरटीओ कार्यालयास जाचक कारवाईबाबत जाब विचारत नुकतेच आंदोलन केले. रिक्षाचालकांच्या समस्यांबद्दल आरटीओंना घेराव घातला. हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेल्या कारवाईबाबत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.

Rickshaw owners facilitate Shivsena leaders.
आमदार कोकाटे समर्थकांनी पराभवाची परतफेड केली

कोरोनाची लाट ओसरत असल्यामुळे आर्थिक स्थिती कशीबशी आता रूळावर येऊ पाहात आहे. या संकटकाळात रिक्षाचालकांना मोठी आर्थिक झळ व अनेक कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागेल. अनेकांना भाजी व खाद्यपदार्थ विक्रीकडे वळावे लागले. आता पुन्हा जेमतेम उदरनिर्वाह होत असताना आरटीओ कार्यालयामार्फत कुठलिही पूर्वसूचनेची नोटीस न देता काही रिक्षा जप्तीची कारवाई सुरू झाली.

त्यातच स्क्रॅपचा बडगा उचलल्याने संबंधित रिक्षाचालकांपुढे मोठे संकट उभे ठाकले. याप्रश्‍नी शिवसेना स्टाईलने आंदोलन झाल्याने शेकडो रिक्षाचालकांना रिक्षा ताब्यात मिळाल्या. याबाबत समाधान व्यक्त करत बसस्थानकाजवळील वंदे मातरम जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, जिल्हा समन्वयक धीरज पाटील, माजी नगरसेवक संजय वाल्हे, संदीप सूर्यवंशी, छोटू माळी आदी पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. यावेळी माधव ठाकरे, मधू वाघ, राहुल शिकारे, आनंद बोरसे, लखन नेरकर, संजीव डोंगरे, छोटू खरात, बापू चौधरी, महेश जाधव, ओशो बावा, भूषण मोरे, सतपाल बावा, संतोष घटी, बाबा वराडे, भावडू गवळी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com