Vinod Tawde, Amit Shah Sarkarnama
मुंबई

BJP Politics : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र; अमित शाह आणि तावडेंच्या भेटीमुळे मुख्यमंत्रि‍पदाचा सस्पेन्स वाढला, नेमकी चर्चा काय?

BJP strategy Amit Shah and Vinod Tawde meeting: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी बुधवारी अचानक भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना तातडीने दिल्लीत भेटीसाठी बोलावलं होतं. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

Jagdish Patil

Maharashtra BJP News: राज्यात महायुतीला एकहाती बहुमत मिळालं आहे तरीही अद्याप सत्ता स्थापनेचा मुहूर्त ठरलेला नाही. महायुतीत मुख्यमंत्रि‍पदावरून शिवेसना आणि भाजपमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला मुख्यमंत्रि‍पदावर दावा नसल्याचे संकेत दिले आहेत. शिंदेंनी मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे.

मात्र, काल अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना काल तातडीने दिल्लीत भेटीसाठी बोलावलं होतं. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे आता पुन्हा एकदा मुख्यमंत्रि‍पदाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.

शिवाय भाजप मुख्यमंत्रि‍पदाच्या निर्णयात धक्कातंत्र वापरणार असल्याच्या चर्चा देखील या भेटीमुळे सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अमित शाह यांनी विनोद तावडेंशी (Vinod Tawde) मुख्यमंत्रि‍पदावर मराठा चेहरा नसल्यास राज्यात काय परिणाम होऊ शकतात, त्याचे काय पडसाद उमटू शकतात याबाबतची माहिती जाणून घेतल्यांची सूत्रांनी माहिती आहे.

तसंच यावेळी शाह यांनी तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठा समाजाची समीकरणं समजून घेतली. जर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री बनवल्यास राज्यातील मराठा मते कशी टिकवता येतील. तसंच बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास त्याचा मतांवर किती परिणाम होऊ शकतो.

याबाबतची चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती आहे. दरम्यान, आज एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार आहे. या बैठकीत मंत्रि‍पदावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT