Amit Shah| Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : पवारसाहेबांवर हल्लाबोल केल्यानंतर गृहमंत्री शहांचा अजितदादांना फोन; नेमकी काय झाली चर्चा?

Amit Shah On Sharad Pawar : अमित शहांनी रविवारी पुण्या झालेल्या चिंतन अधिवेशनातून शरद पवारसाहेबांवर टीका केली होती. यातच आता अमित शाह यांनी अजितदादांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Akshay Sabale

Maharashtra Political News : 'शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत,' असा हल्लाबोल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी यांच्यावर केला होता.

यानंतर गृहमंत्री शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोन करून संवाद साधला आहे. अजितदादांचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त अमित शहांनी (Amit Shah) फोन करून शुभेच्छा दिल्याची माहिती मिळत आहे.

अजितदादा अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पारनेर तालुक्यातून अजितदादांच्या (Ajit Pawar) दौऱ्याला सुरूवात होत असून कर्जत तालुक्यात दौऱ्याचा समारोप होईल. ते पारनेर, नगर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यातील महिलांशी संवाद साधणार असून 'लाडकी बहीण योजने'च्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. अजितदादांसोबत कृषीमंत्री धनंजय मुंडे, मंत्री आदिती तटकरे, रूपाली चाकणकर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

यातच अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर अभिष्टचिंतनांचा वर्षाव होत आहे. अनेक वरिष्ठ नेते, सर्वपक्षीय कार्यकर्ते, समाजाच्या विविध घटकातील मान्यवरांनी अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गृहमंत्री शाह यांनी सकाळीच अजितदादांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत. अजितदादांनी अमित शाह यांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानल्याचं सांगण्यात येत आहे.

रविवारी पुण्यातील 'चिंतन' अधिवेशनातून गृहमंत्री शाह यांनी शरद पवारसाहेबांवर टीका केली होती. याबद्दल प्रसारमाध्यमांशी अजितदादांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, "मला याबाबत माहिती नाही. मी पिंपरी-चिंचडवमध्ये आहे. ते नेमकं काय बोलले आहेत? ते ऐकल्यावर आणि पाहिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देईल."

अमित शाह रविवारी काय म्हणाले?

"शरद पवार देशाच्या राजकारणातील सर्वांत जास्त भ्रष्टाचारी आहेत. ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले. शरद पवार यांनी दहा वर्षांत काय केले, याचा हिशोब द्यावा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांना पुण्यातील कोणत्याही चौकात भाजपचा दहा वर्षांतील हिशोब देतील," असं म्हणत अमित शहांनी टीकास्त्र डागलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT