Amit Shah Pune : 'मै बनिया का बेटा हूं, गॅरंटी के बगेर वापस नहीं जाऊंगा!'; अमित शाह असं का म्हणाले?

BJP Pune Adhiveshan and Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटे बोलून मते घेतली. आता त्यांच्या खोटेपणाची पोलखोल करायची वेळ आली आहे.
Amit Shah
Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा प्रचार केला. जनतेत भ्रमाचे वातावरण निर्मिती करून मते घेतली. आता विधानसभा निवडणुकीत त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे.

त्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदावार निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. ती तुम्हाला करावी लागणार आहे. 'मै बनिया का बेटा हूं, गॅरंटी के बगेर वापस नहीं जाऊंगा, अशी हमीच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी राज्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून घेतली.

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात शाह Amit Shah बोलत होते. त्यावेळी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर तोफ डागली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटे बोलून मते घेतली. आता त्यांच्या खोटेपणाची पोलखोल करायची वेळ आली आहे. शरद पवार, आता तुमचे खोटे चालणार नाही, हे राज्यभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांना समजले आहे.

शरद पवार Sharad Pawar आणि इतर नेत्यांनी केलेल्या खोट्या प्रचाराची घरोघरी जाऊन पोलखोल करायची आहे. त्याचे उत्तर द्यायचे आहे. पर्दाफाश कारायचा आहे. ते खोटे बोलतील, भ्रमही पसरवतील. त्यातून समाजात विवादही निर्माण करतील, मात्र हे आता चालणार नाही, असा इशाराही शाह यांनी दिला.

Amit Shah
Amit Shah Vs Sharad Pawar : कोणताही चौक निवडा, मोहोळ हिशेब घेऊन येतील; शहांचं पवारांना ओपन चॅलेंज!

आता भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो, की विधानसभा निवडणूक होईपर्यंत तुम्ही स्वतःला बाजुला ठेवा. प्रत्येकाने कमळाला समोर ठेवा. प्रत्येक कार्यकर्ता कमळाला समर्पित झाला पाहिजे. आपल्याला कमळाला जिंकवण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करवी लागणार आहे. कमळाच्या चिन्हावरील उमेदावाराला जिंकवण्यासाठी भाजपपेक्षाही जास्त काम प्रत्येकाने केले पाहिजे, असे आवाहनही अमित शाह यांनी केले.

आता मला सांगा की महायुतीला जिंकवायचे की नाही? युतीला जिंकवण्यासाठी जोर लावणार का? भाजपच्या प्रत्येक उमेदवारासाठी जास्तीत जास्त काम करणार का? मै बनिया का बेटा हूं, गॅरंटी के बगेर वापस नहीं जाऊंगा. ही निवडणूक म्हणजे विरोधकांच्या खोटेपणाचे उत्तर असणार आहे, ते देणार का, असे आवाहन करताच उपस्थितांनी एकाच स्वरात हो.. हो.. असे उत्तरे दिली. त्यामुळे या अधिवेशनातून भाजपने विधानसभेचे रणशिंग फुंकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Amit Shah
Hiraman Khoskar : आधीच 'क्रॉस व्होटिंग'चा संशय, त्यात मुख्यमंत्र्यांची भेट; हिरामण खोसकरांचं चाललंय तरी काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com