Amit Shah & Maharashtra BJP leaders
Amit Shah & Maharashtra BJP leaders sarkarnama
मुंबई

शिंदे गटासोबत सत्तेत मात्र स्वबळाच्या तयारीला लागा; शहांच राज्यातील नेत्यांना नवं 'टार्गेट'

ज्ञानेश सावंत

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत हातमिळवणी करून आता आपण सरकार स्थापन केलं आहे. पण यापुढे आपल्याला लोकांमधले सरकार हवे आहे, असे बाजावून सांगताना राज्यात भाजपचे (BJP) स्वबळाचे सरकार आणणण्याचे 'टार्गेट' केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी प्रदेश पातळीवरच्या नेत्यांना दिले.

सत्तेत आला म्हणून नुसतेच फिरू नका, अशा शब्दांत त्यांनी राज्यातील नेत्यांचे कान टोचले. तसेच तळातल्या घटकांपर्यंत पोचा आणि सरकारची ताकद दाखवा,असे आवाहनही यांनी केले. याबरोबरच शिंदे गटालाही पुढच्या निवडणुकीत गृहीत न धरता स्वबळावर निवडणुक जिंकायची असल्याचा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी देत शिंदे गटाचे टेंन्शन वाढवल आहे. (Amit Shah & Maharashtra BJP leaders Latest News)

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा आणि लोकसभा केंद्रस्थानी ठेवून शहा यांनी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, संभाजी पाटील-निलंगेकर आदी उपस्थिती होते. नवे राजकीय समीकरण, शिंदे गटासोबतची मैत्री, त्यावरील जनमत, पुढच्या निवडणुकीतील फायदे-तोटे आणि सरकारचा कार्यक्रम यांवर शहांनी प्रत्येकाची मते जाणून घेतली.

शहा म्हणाले, "महाराष्ट्रात भाजपची वाटचाल दमदार ठेवण्यासाठी लोकांना विकासकामांशी जोडा. लोकांच्या भल्यासाठी आखलेले प्रकल्प त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडून त्याचे महत्त्व पटवून द्या. सरकार आल्यानंतर अनेक मंत्री, आमदार लोकांपासून लांब जातात आणि पुढे त्याचाच फटका बसतो. त्यामुळे तळाल्या प्रत्येकाशी सरकार म्हणून पोचले पाहिजे. राजकारण करणाऱ्यांना सडेतोड उत्तरे देऊन पुढे जा.' राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून अन्य निवडणुकांच्या तयारी वेगाने करून, त्याबाबतची जबाबदार वाटून देऊन त्यांचे मूल्यमापन करा. विधान परिषदेसह अन्य निवडणुकांसाठी दिल्लीत बैठक घेण्यात येईल,असेही शहा यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपच्या नेत्या आणि कोअर कमिटीच्या सदस्य पंकजा मुंडे मात्र शहा यांच्या बैठकीला हजर नव्हत्या. पक्षात गेल्या काही दिवसांपासून महत्त्वाच्या निर्णयांत नसलेल्या मुंडे या नाराज असल्याचे बोलले जाते. विधान परिषद आणि त्यानंतर सरकारमध्येही त्यांना सामावून न घेतल्याने मुंडे यांच्या समर्थकांनी उघडपणे नाराजी मांडली होती. राज्यात भाजपचे सरकार येऊनही मुंडे या फारशा सक्रिया दिसत नाही. मात्र, शहा यांच्या दौऱ्यात त्या दिसण्याची आशा होती. प्रत्यक्षात मात्र, दिवसभरात कुठेच नसल्याची चर्चा रंगली होती. मात्र, मुंडे यांच्या गौरी असल्याने बैठकीला येऊ शकल्या नसल्याचे कारण केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT