खैरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना पटतील अशा तरी थापा माराव्यात...

Chandrakant Khaire : खैरेंचे वक्तव्य म्हणजे राऊतांच्या रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतःचे महत्व वाढविण्याचा विनोदी प्रयत्न सुरू आहे.
Shivsena Leader Chandrakant Khaire Latest News
Shivsena Leader Chandrakant Khaire Latest NewsSarkarnama

Chandrakant Khaire : भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (ता.५ ऑगस्ट) मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर शिवसेनेच्या नेत्यांकडूनही त्यां शहांवर टीका करण्यात आली आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शहांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

'मी त्या बैठकीला शिवसेना नेता म्हणून उपस्थित होतो. उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना बोलावलं होतं. तेव्हा एकेका पक्षाला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद द्यायच असे ठरलं होतं, इतके झाल्यानंतर देखील शहा ठाकरेंवर टीका करत असतील तर ही चिड येणारी बाब आहे,” अशा शब्दात खैरेंनी टीका केली.

यावर भाजप नेत्यांकडूव प्रतिक्रिया आली असून उद्धव ठाकरे आणि शहा यांच्यात झालेल्या बैठकीत शिवसेना नेता म्हणून मी हजर होतो. हे खैरेंचे वक्तव्य म्हणजे संजय राऊत तुरुंगात गेल्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतःचे महत्व वाढविण्याचा विनोदी प्रयत्न आहे, अशा शब्दात भाजपचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी खैरेंना टोला लगावला आहे. (Shivsena Leader Chandrakant Khaire Latest News)

Shivsena Leader Chandrakant Khaire Latest News
रस्ते अपघातांना कोण जबाबदार?; गडकरींनी केला खुलासा

उपाध्ये म्हणाले, तसेही आता शिल्लक सेनेत बरळूंची कमतरता भासत असल्याने आपल्याला 'मातोश्री'ची मर्जी संपादन करता येईल असा खैरेंचा गनिमी कावा असावा. त्यासाठीच ते आवाक्याबाहेरची मुक्ताफळे उधळत आहेत. शिल्लक सेनेच्या प्रमुखांचा आणि, पेंग्विनसेनेच्या बाल नेत्यांचा वाढदिवस किंवा तथाकथित गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पायावर डोके ठेवण्यापलीकडे ज्यांना कधीही 'मातोश्री'च्या उंबरठ्यातून आत प्रवेश देखील मिळाला नाही, अशा दुय्यम नेत्याने शहां सोबतच्या बैठकीला आपण हजर होतो असे कितीही ओरडून सांगितले तरी पेंग्विनसेनेच्या कार्यकर्ता देखील त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, असा घणाघात उपाध्ये यांनी खैरेंवर केला आहे.

Shivsena Leader Chandrakant Khaire Latest News
माझ्या अटकेसाठी सीबीआय अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याने त्यांनी आत्महत्या केली: सिसोदिया

दरम्यान, मातोश्रीवर शिरकाव मिळावा यासाठी आमच्या नेत्यावर टीका करून स्वतःचे हसे करून घेण्यापूर्वी खैरेंनी शिल्लकसेनेच्या प्रमुखांची परवानगी घेतली का? असा आमचा सवाल असून ठाकरेंचा धडधडीत खोटेपणा शहांनी उघड केल्यामुळे लपून राहिलेल्या पेंग्विनसेनेतील राऊतांची जागा घेण्यासाठी खैरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना तरी पटतील अशा थापा माराव्यात, असा जोरदार टोलाही लगावला आहे.

मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचा प्रतिकार सेनेकडूनही ताकदीने केला जात आहे. यामुळे आगामी मुंबई पालिकेची निवडणूक ही देशाच लक्ष वेधणारी ठरणार, असेच चित्र निर्माण झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com