Shraddha Walker Murder Case
Shraddha Walker Murder Case  sarkarnama
मुंबई

Shraddha Walker प्रकरणावरुन राजकारण सुरु ; शहा म्हणाले, " श्रद्धाने तक्रार केली तेव्हा आमचं सरकार नव्हतं.."

सरकारनामा ब्युरो

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्याप्रकरणात दररोज नवी माहिती मिळत आहे. तिचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताब पूनावालाच्या छत्तरपूर येथील फ्लॅटमधून दिल्ली पोलिसांनी पाच धारदार सुरे जप्त केले. गुरुवारी जप्त केलेले सुरे हत्याकांडात वापरले होते किंवा कसे याची पडताळणी करण्यासाठी ते रासायनिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. (Shraddha Walker Murder Case News update)

श्रध्दा वालकर हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणानंतर आफताबबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासात दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलीस यांच्यात समन्वय आहे. यावर पहिल्यादांच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धा वालकरच्या आरोपीला कठोर शिक्षा होईल, असे शहा म्हणाले. आरोपी आफताब हा ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.

अमित शहा म्हणाले, “ या प्रकरणावर माझं संपूर्ण लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, हे ज्या कोणीही केले असेल, दिल्ली पोलिस न्यायालयाच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत कठोर शिक्षा देईल,"

"दिल्ली पोलिसांची यात कोणतीही भूमिका नाही. 2020 मध्ये, श्रद्धाने महाराष्ट्रातील पोलीस स्टेशनला पत्र देऊन तिच्या शरीराचे तुकडे केले जाणार असल्याची तक्रार केली होती आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तेव्हा त्या तक्रारीवर कोणतीही कारवाई का झाली नाही. याची देखील चौकशी होणार आहे. त्यावेळी राज्यात आमचे सरकार नव्हते. या प्रकरणाला जो कोणी जबाबदार असेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,"असे शहा यांनी सांगितले.

"श्रद्धाच्या मारेकऱ्यास शक्य तितक्या लवकर कठोर शिक्षा होईल याची खबरदारी दिल्ली पोलिस आणि सरकारी वकील घेतील," अशी ग्वाही अमित शहा यांनी दिली. दिल्ली पोलिसांच्या पथकाने भाईंदरच्या खाडीत मोबाइल फोनचा शोध घेतला. आठवडाभरापासून हे पथक वसईत तळ ठोकून आहे.

श्रध्दा वालकर हिची तिच्या प्रियकर आफताबने हत्या केल्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रिजमध्ये ठेवले. त्यानंतर त्याने हे तुकडे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी टाकले असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT