Mumbai News, 02 Sep : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे पुण्यातील एका महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेले होते. या पाहणीदरम्यान त्यांनी महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवला होता. यावरून भाजप विरुद्ध मनसे असा वाद सुरू झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाने मुंबईत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर जाऊन आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. मात्र, भाजपच्या या आंदोलनाआधीच मनसैनिक शिवतीर्थाबाहेर पोहोचले.
त्यानंतर कृष्णराज महाडिक आणि भाजयुमोचे कार्यकर्ते जिथे जमले होते, त्या माहीममध्ये भाजप आणि मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि तिथे जोरदार राडा झाला. या राड्यानंतर भाजपकडून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना भाजयुमोचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनसे समर्थकांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप केला.
ते म्हणाले, “आम्ही शांतपणे आंदोलन करत होतो. त्यावेळी आमच्यावर मनसेचे गुंड आक्रमक झाले. आमच्यावर मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझ्यावरही काही मुलं धावून आली. या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे.” दरम्यान, कृष्णराज महाडिक यांच्या याच वक्तव्याचा एक व्हिडिओ शेअर करत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कृष्णराज महाडिक यांना डिवचले आहे.
एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये राऊतांनी लिहीलं की, “बाळा, तू चुकीच्या पक्षात आहेस! ही मुंबई आहे, ती आजही शिवसेना, अस्सल मराठी माणूस आणि ठाकऱ्यांचीच आहे. बाकी सगळे येतात आणि जातात!”, असं म्हणत राऊत यांनी मुंबईत फक्त ठाकरेंचंच चालतं, असं म्हणत महाडिक आणि भाजपला डिवचलं आहे. त्यामुळे आता राऊत यांच्या या पोस्टवर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.