PMC News: देवेंद्र फडणवीसांची तंबी; सुनेत्रा पवार अन् चंद्रकांतदादांची शिष्टाई; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीतील वादाला 'ब्रेक'

PMC BJP NCP Dispute: पुणे महापालिकेतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने मिटला. देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीनंतर स्थानिक नेत्यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश.
PMC BJP NCP Dispute
PMC BJP NCP DisputeSarkarnama
Published on
Updated on

Pune News: महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद अखेर वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर शांत झाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात झालेली चर्चा आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजपच्या स्थानिक नेत्यांची घेतलेली कानउघडणी, यामुळे दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाला ‘जुळवून घेण्याची’ भूमिका घ्यावी लागली आहे.

राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा विकासनिधी शून्य करण्याचा निर्णय आणि त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये रंगलेली शाब्दिक खडाजंगी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे पुण्यातील स्थानिक राजकारणातील हा वाद आता राज्याच्या राजकारणावर परिणाम करण्याची शक्यता निर्माण झाली होती.

सुनेत्रा पवार-चंद्रकांत पाटील यांच्या चर्चेने वादाला ‘ब्रेक’

महापालिकेतील हा वाद वाढू नये, यासाठी सुनेत्रा पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात नुकतीच चर्चा झाली. पुण्यातील स्थानिक नेत्यांमधील भांडणाचा परिणाम राज्यभरातील भाजप-राष्ट्रवादी संबंधांवर होऊ शकतो, याची जाणीव दोन्ही नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाला करून दिली.

वादग्रस्त विषय पुन्हा उकरून न काढता दोन्ही पक्षांनी समन्वयाने काम करावे, अशी भूमिका या चर्चेत घेण्यात आली. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना आणि नगरसेवकांना समज देत वाद मिटवण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्याचाच परिणाम म्हणून महापालिकेत दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची बैठक घेण्यात आली.

PMC BJP NCP Dispute
Dhiraj Deshmukh: मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर! धीरज देशमुख यांनी फडणवीसांकडे मांडली शेतकऱ्यांची व्यथा

फडणवीसांची ‘शाळा’; गटबाजीवर थेट इशारा

सोमवारी स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा केंद्रात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील स्थानिक भाजप नेत्यांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेतील अंतर्गत गटबाजी, युतीतील धुसफूस, आमदार-खासदारांचे वेगवेगळे गट आणि स्थानिक नेतृत्वातील समन्वयाचा अभाव यावर फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

PMC BJP NCP Dispute
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कठोर भूमिकेवर फडणवीसांचा 'मध्यम मार्ग'; आदेशाला स्थगिती देत घेतला मोठा निर्णय

‘आपापले गट बाजूला ठेवा आणि पक्षाला प्राधान्य द्या; अन्यथा पक्षश्रेष्ठींकडून कडक निर्णय घेतले जातील,’ असा स्पष्ट संदेशच फडणवीसांनी स्थानिक नेत्यांना दिल्याची चर्चा आहे.त्यामुळे एकीकडे सुनेत्रा पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील चर्चेतून राष्ट्रवादी-भाजपला समन्वयाचा संदेश मिळाला, तर दुसरीकडे फडणवीसांच्या तंबीमुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वालाही वाद वाढविण्याऐवजी तोडगा काढण्याची भूमिका घ्यावी लागली आहे. मात्र ही दिलजमाई किती काळ चालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com