Mahim Constituency News : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील माहिम मतदारसंघात हायव्होल्टेज लढत होत आहे. मनसेचे अमित ठाकरे (Amit Thackeray), एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महेश सावंत यांनी माहिमचा गड काबीज करण्यासाठी दंड थोपटलं आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. याचवेळी माहिममधून मनसेसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
एकीकडे एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात असलेल्या सरवणकरांनीही पुन्हा आमदारकी मिळवण्यासाठी ताकद पणाला लावल्यानंतर आता मनसेला (MNS) या मतदारसंघात मोठा दिलासा मिळाला आहे. माहिममध्ये बंजारा समाजानं अमित ठाकरेंना पाठींबा जाहीर केला आहे.यामुळे त्यांची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून सरवणकरांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
माहिम विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेनं आपली निवडणुकीसाठीची भूमिका जाहीर केली आहे. या संघटनेनं मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंना जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मनसेच्या सोशल मीडियावरुन करण्यात आली आहे.
बंजारा समाज हा मुंबई,ठाणे भागात नोकरी,मजुरी आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर वास्तव्याला आहे.माहिममध्येही या समाजाची संख्या मोठी आहे.गोरबंजारा समाजात राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना समजली जाते.या संघटनेमुळे गोरबंजारा समाजातील सर्व तांडे धर्मपीठाशी जोडले गेले आहेत. तसेच राष्ट्रीय बंजारा परिषदेच्यावतीने धार्मिक,सामाजिक उपक्रम राबविले जातात.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे 5 दिवस शिल्लक असताना माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना बंजारा समाजातील मोठ्या संघटनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंना मोठी ताकद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या मेनका राठोड यांनी मनसेच्या अमित ठाकरेंना समर्थन देण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या,गोरगरीब लोकांसाठी असणारी आपुलकी आणि त्यांच्या अडचणींमध्ये धावत जाऊन त्यांना मदत करण्याच्या मनसेच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. म्हणूनच आम्ही अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा देत आहोत, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी सभा पार पडली होती.ही सभा प्रभादेवीच्या सामना प्रेसजवळ घेण्यात आली.यावेळी बोलताना राज ठाकरेंनी सदा सरवणकर आणि महेश सावंत यांच्यावरही टीका केली होती.तसेच आदित्य ठाकरे निवडणुकीसाठी उभे राहिल्यावर त्यांच्यासाठी उमेदवार दिला नाही, याबद्दलही त्यांनी पुनरुच्चार केला.तसेच अमित ठाकरेंसाठी कोणाकडेही भीक मागणार नाही,पण निवडून आणणारच,असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.