औरंगाबाद : मनसे विद्यार्थी सेनेचे राज्यप्रमुख अमित राज ठाकरे (amit raj thackeray) संघटना बांधणीसाठी सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर अमित ठाकरे यांनी दौऱ्यात तरुणाईचं लक्ष वेधून घेतलं आहे. शुक्रवारी त्यांनी मनसेच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ठाकरे घराण्यातील युवा नेत्यांबाबत असलेली क्रेझ शुक्रवारी दिसली. (amit thackeray latest news)
राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींबाबत अमित ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'राजकारणाचा दर्जा घसरत चाललायं. महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहून मी राजकारणात आलो नसतो,' असे अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. "मी जर राज ठाकरे यांचा मुलगा नसतो तर राजकारणात आलो नसतो," असे अमित ठाकरे म्हणाले.
ठाकरे-शिंदे गट, भाजप-शिंदे गटाची युती, मुंबई महापालिका निवडणूक, मनसेचे भोंगे आंदोलन, सध्याचे राजकारण यावर त्यांनी भाष्य केलं. "मनसेचा बॅड पॅच संपला आहे. वेळ आल्यास आपणही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू," असे विधान अमित ठाकरे यांनी केल्यानं चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकीसाठी अमित ठाकरे सज्ज असल्याचे त्यांच्या विधानावरुन स्पष्ट झाले आहे.
खरी शिवसेना कुणाची, यावरुन राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कलगीतुरा रंगला आहे, हा मुद्दा न्यायालयात आहे. याबाबत अमित ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, "बाळासाहेबांसाठी वाईट वाटले. बाकी कुणासाठी काही वाटले नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष देतो. दसरा मेळावादेखील पाहायला मी गेलो नाही. जनतेकडून आम्हाला मिळणारे प्रेम बघून डोळ्यांत पाणी येतं,"
ठाकरेंनी एकत्र यावे असे वाटते का? यावर ते म्हणाले, "का वाटावे? आम्ही आमचे काम करतो आहोत. मध्ये काही काळ साडेसाती की काय असावी. मात्र आता तो काळ संपला आहे. प्रत्येक पक्षाचा बॅड पॅच असतो. याच काळात माझ्यावर पक्षाची जबाबदारी आली. त्यामुळे वाईट परिस्थितीतच खरे शिकायला मिळते,"
मनसेनं सुरु केलेले भोंगे आंदोलन सध्या थंड पडले आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, " आमचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. आम्हाला सरकारला जागे करायचे होते ते आम्ही केले. आता हा प्रश्न सरकारला विचारा. त्यांचे भोंगे कधी बंद करणार की आमच्या भोंग्यांना परवानगी देणार?"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.