औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे (uddhav thackeray), आदित्य ठाकरे यांचा बोलबाला सुरु असताना ठाकरे घराण्यातील आणखी एका ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे (MNS Amit Thackeray) यांनी केलेल्या विधानाची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. ( Amit Thackeray latest news)
मनसे विद्यार्थी सेनेचे राज्यप्रमुख अमित राज ठाकरे हे (amit raj thackeray) संघटना बांधणीसाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. ते शुक्रवारी एका मुलाखतीत बोलत होते. ठाकरे-शिंदे गट, भाजप-शिंदे गटाची युती, मुंबई महापालिका निवडणूक, मनसेचे भोंगे आंदोलन, सध्याचे राजकारण यावर त्यांनी भाष्य केलं.
"मनसेचा बॅड पॅच संपला आहे. वेळ आल्यास आपणही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरू," असे विधान अमित ठाकरे यांनी केल्यानं चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकीसाठी अमित ठाकरे सज्ज असल्याचे त्यांच्या विधानावरुन स्पष्ट झाले आहे.
खरी शिवसेना कुणाची, यावरुन राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कलगीतुरा रंगला आहे, हा मुद्दा न्यायालयात आहे. याबाबत अमित ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, "बाळासाहेबांसाठी वाईट वाटले. बाकी कुणासाठी काही वाटले नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष देतो. दसरा मेळावादेखील पाहायला मी गेलो नाही. जनतेकडून आम्हाला मिळणारे प्रेम बघून डोळ्यांत पाणी येतं,"
ठाकरेंनी एकत्र यावे असे वाटते का? यावर ते म्हणाले, "का वाटावे? आम्ही आमचे काम करतो आहोत. मध्ये काही काळ साडेसाती की काय असावी. मात्र आता तो काळ संपला आहे. प्रत्येक पक्षाचा बॅड पॅच असतो. याच काळात माझ्यावर पक्षाची जबाबदारी आली. त्यामुळे वाईट परिस्थितीतच खरे शिकायला मिळते,"
मनसेनं सुरु केलेले भोंगे आंदोलन सध्या थंड पडले आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना अमित ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आमचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. आम्हाला सरकारला जागे करायचे होते ते आम्ही केले. आता हा प्रश्न सरकारला विचारा. त्यांचे भोंगे कधी बंद करणार की आमच्या भोंग्यांना परवानगी देणार?"
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.