Mumbai News, 10 Jan : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नव्या वादाला सुरुवात झाली आहे. "विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही आणि ठाकरेंची शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही", असं वक्तव्य कोल्हे यांनी केलं आहे.
तर आता त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस (Congress) नेत्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये दोन दिवसांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढण्यासाठी अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) भाषण केलं. आपल्या भाषणातून त्यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा नव्या दमाने कामाला लागण्याचं आवाहन केलं. मात्र, याचवेळी त्यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना टोला देखील लगावला. ते म्हणाले, "विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झालेली नाही.
मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादीला राज्यात विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठा स्पेस आहे. त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार (Sharad Pawar) आहेत. लक्षात ठेवा बचेंगे तो और भी लढेंगे."
दरम्यान, अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमोल कोल्हेंना एवढंच सांगतो त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे जास्त लक्ष द्यावं आणि आम्हाला कमी सल्ला कमी द्यावा, असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आता विधानसभेतील पराभवानंतर महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल असल्याचं दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.