Amol mitkari Latest News 
Ramdev baba
Amol mitkari Latest News Ramdev baba  Sarkarnama
मुंबई

Amol Mitkari News: '' कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा...?''

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : योगगुरु रामदेव बाबा हे त्यांच्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. त्यांच्या काही वक्ततव्यांमुळे अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.

ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबा यांनी महिला साडी नेसल्यावर,सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. आणि काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात असं विधान केलं. आता याच विधानावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ( Amol Mitkari) यांनी रामदेव बाबांवर खरमरीत टीका केली आहे.

ठाण्यातील हायलँड मैदानात योगगुरु रामदेव बाबा यांच्या योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला खासदार श्रीकांत शिंदे, अमृता फडणवीस, आमदार रवी राणा, दीपाली सय्यद हे देखील उपसि्थत होते.

यावेळी बोलताना रामदेव बाबा ( Ramdev baba) म्हणाले, महिला साडी नेसल्यावर,सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. आणि काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात असं विधान केलं. या बाबा रामदेव यांच्या विधानाचा विरोधकांकडून खरपूस शब्दांत समाचार घेतला जात आहे.

याचदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार यांनी टिवि्ट करत बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कुठं ते गाडगेबाबा आणि कुठे हा रामदेव बाबा? महाराष्ट्रात तुकोबा ते गाडगेबाबा अशी संतांची सुसंस्कृत परंपरा आहे. आज रामदेव बाबांनी स्त्रियांचा अपमान करून या परंपरेला तडा दिला आहे. "छाटी भगवी मानसी! व्यर्थ म्हणे मी संन्यासी! तुका म्हणे तोचि वेडा त्याचे हाणूनी थोबाड फोडा अशा आशयाचं टिवि्ट करत निशाणा साधला आहे.

अमृता फडणवीस पुढील शंभर वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत...

अमृता फडणवीस पुरेसं अन्न खातात. पुढील शंभर वर्ष ते म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे. अशा शब्दांत बाबा रामदेव यांनी अमृता फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT