Amruta Fadnavis : राज्यपाल महाराष्ट्रप्रेमीच; पण त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला जातो..!

Amruta Fadnavis : महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे एकमेव असे राज्यपाल आहेत. ज्यांनी महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकली.
Amruta Fadnavis latest news 
Bhagat singh Koshyari 
Chhatrapati Shivaji Maharaj
Amruta Fadnavis latest news Bhagat singh Koshyari Chhatrapati Shivaji Maharaj Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governer Bhagat singh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शरद पवार, उध्दव ठाकरे या प्रमुख नेत्यांसह विरोधकांनी राज्यापालांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच त्यांना राज्यपाल पदावरुन हटवण्याची मागणी देखील जोर धरु लागली असतानाच आता अमृता फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारींची पाठराखण केली आहे. ( Amruta Fadnavis Latest News)

Amruta Fadnavis latest news 
Bhagat singh Koshyari 
Chhatrapati Shivaji Maharaj
Bhagat Singh Koshyari ; कोश्यारींची उचलबांगडी की कानउघाडणी ; पक्षश्रेष्ठींनी दिल्लीला बोलवलं..

ठाण्यातील योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलनात अमृता फडणवीस उपस्थित होत्या.यावेळी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाल्या, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे एकमेव असे राज्यपाल आहेत. ज्यांनी महाराष्ट्रात येऊन मराठी भाषा शिकली. मराठी बोलण्याच्या वेगात ते काही बोलून जातात. त्याचा वेगळा अर्थ काढला जातो. ते मनापासून महाराष्ट्र आणि मराठी माणसावर प्रेम करणारे आहेत.

मराठी माणसांवर त्यांचं खूप प्रेम आहे. हे मी स्वत: देखील अनुभवलं आहे. मात्र, अनेक वेळा त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ काढला जातो. यापूर्वीही अनेकदा असं घडलं आहे. मात्र, त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे अशा शब्दात फडणवीसांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे.

Amruta Fadnavis latest news 
Bhagat singh Koshyari 
Chhatrapati Shivaji Maharaj
Satara : कर्नाटकचे मुख्यमंत्री मुंबई, नागपूर मागायचे राहिलेत...पृथ्वीराज चव्हाण

श्रध्दा हत्याकांडावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

श्रद्धा वालकर हत्या प्रकरण हे अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेच्या मुळाशी जात श्रध्दाला न्याय मिळणं गरजेचं आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणं देखील गरजेचं आहे. आणि जर श्रध्दा हत्या तपासांत काही त्रृटी राहिल्या असतील, तर तपास करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशीही भूमिका फडणवीस यांनी स्पष्ट केले.

काय होतं राज्यपालांचं वक्तव्य ?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले होते, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा शिक्षक आम्हाला विचारायचे, तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हांला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत. मी आत्ताच्या काळाबाबत बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com