Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजितदादांची साथ सोडणाऱ्यांना माफ करणार नाही; राष्ट्रवादीचा इशारा

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra NCP Political News : विधानसभा निवडणूक जवळ येईल तशी अनेक राजकीय नेत्यांची चलबिचल सुरू झाल्याचे दिसून येत आहे. आपले राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी महायुती - महाविकास आघाडीत इनकमिंग - आऊटगोईंग सुरू झाले आहे. याचा फटका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला जास्त बसत असल्याचे दिसते.

सध्या राष्ट्रवादीत अतुल बेनके, चेतन तुपे आणि नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी सूचक इशारा दिला आहे.

अजित पवार Ajit Pawar गटातील नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. आमदार नरहरी झिरवळ हे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. तर आमदार चेतन तुपे पवारांच्या व्यासपीठावर दिसले. यावर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी सोडून जाणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असा सूचक इशारा दिला आहे.

मिटकरी म्हणाले, अजित पवारांची साथ सोडून बाहेर पक्षात जात असलेल्या गद्दारांना जनता माफ करणार नाही. अजितदादांनी अमोल कोल्हे, निलेश लंके, बाबाजानी दुर्राणी यांच्यासारख्या लोकांना खूप काही दिले आहे. त्यानंतरही त्यांनी विश्वासघात केला आहे, असा आरोपही मिटकरींनी केला.

मिटकरींनी चेतन तुपे हे शरद पवारांच्या Sharad Pawar व्यासपीठावर गेल्याच्या मुद्द्यावर हे स्पष्टीकरण दिले आहे. एखाद्या नेत्याच्या व्यासपीठावर जाणे म्हणजे त्या पक्षात प्रवेश करणे नव्हे, असे ते म्हणाले. दरम्यान, लवकरच राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार असल्याचाही गौप्यस्फोट आमदार मिटकरी यांनी यावेळी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT