Maharashtra Political News : राज्यात लोकसभा मनापासून लढवली. आता विधानसभेत महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी आम्ही आडवे कोण येईल, कोण नाही, याचा विचार करणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाला डिवचले.
आगामी विधानसभेत त्यांना 20 ते 22 जागा मिळतील, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला. यावर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पलटवार केला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये रोहित पवार Rohit Pawar म्हणाले, बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. आता चेतन तुपे हे देखील आपल्या पक्षाच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांनी शरद पवारांच्या व्यावसपिठावर हजेरी लावली होती. यातून निवडणूक अवघड जातेय असल्याचे त्या लोकांना जाणवायला लागले असेल, हेच यातून दिसून येत आहे. शरद पवारांनी आम्हाला, लोकसभा लढायची ही मनापासून लढायची असल्याचे सांगितले होते. आता विधानसभा जिंकून महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी 70-80 जागांसाठी दावा केला आहे. मात्र आम्हाला सन्मानजनक जागा मिळतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले. यावर रोहित पवारांनी, '20-22 जागा सन्मानजनक असतील, तर मग तो त्यांचा विषय आहे. आता विधानसभा निवडणुकीत काय होतेय, ते पाहुया त्यांना किती जागा मिळतील, असा टोलाही लगावाल. यावर सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.
सुनील तटकरे Sunil Tatkare म्हणाले, रोहित पवारांच्या पक्षाला किती जागा मिळतील याची काळजी त्यांनी करावी. आमची काळजी करण्याची कुणी आवश्यकता नाही. महायुतीत किती जागा मिळवायच्या पक्षाचे स्थान किती आहे, हे निश्चितपणे आम्हाला माहीत आहे. ते येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल, असेही तटकरेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्यातील मराठा आंदोलनाबाबत शरद पवारांच्या भूमिकेबाबत सुनील तटकरेंना छेडण्यात आले. त्यावर, शरद पवार हे देशाचे वरिष्ठ नेते आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सामाजिक दरी निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले. सर्वांनी सामंजस्याने या विषयावर एकमत करावे.
राष्ट्रवादीची मराठा समाजाला ओबीसींच्या हक्काला धक्का न लावता आरक्षण दिले पाहिजे, अशी भूमिका आहे. हे आरक्षण युती सरकारने दहा टक्के दिले आहे. त्यावर याचिका दाखल असली तरी या आरक्षणाचा वेगवेगळ्या घटकांना लाभ मिळत आहे, याकडेही तटकरेंनी लक्ष वेधले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.