Amol Mitkari,
Amol Mitkari,  Sarkarnama
मुंबई

Amol Mitkari : 'त्या' व्हिडिओची अमोल मिटकरी करणार उद्या पोलखोल..

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Assembly Winter Session : नागपूर येथे सुरु असलेले हिवाळी अधिवेशन अनेक विषयावरुन गाजत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन, दिशा सँलियन प्रकरण, खासदार राहुल शेवाळे यांची एसआयटी चौकशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भूखंड घोटाळा या विषयावरुन सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले आहेत. (Maharashtra Assembly Winter Session news update)

यात आमदार निवासात कपबशा धुण्यासाठी शौचालयाचे पाणी वापरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे या मुद्दावरुन सभागृहातील वातावरण तापलं आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केला होता. आमदार निवासातील उपहारगृहातील टॉयलेटमध्ये कपबशा धुतल्या जात असल्याचा आरोप मिटकरींनी केला होता.

या व्हिडिओवरुन सभागृहात गदारोळ झाला. त्यानंतर हा व्हिडिओ आमदार निवासातील उपहारगृहातील नसून दुसऱ्या ठिकाणचा असल्याचे राज्याच्या बांधकाम विभागाने म्हटलं आहे. बांधकाम विभागाने मिटकरी यांनी केलेले हे आरोप फेटाळले आहे. त्यावर अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण केलं आहे. त्यांनी याबाबत आज पुन्हा टि्वट करीत उद्या (सोमवारी) याबाबत माहिती देणार असल्याचे म्हटलं आहे. मिटकरींनी टि्वट करत हा व्हिडिओ कुठला आहे, हे उद्या (सोमवारी) पत्रकारांना स्वतः दाखवून देणार असल्याची माहिती दिली आहे.

“सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार निवासातील शेअर केलेला शौचालयामधील किळसवाणा प्रकाराचा व्हिडिओ तिथला नसल्याचे पत्रकारांना खोटे सांगितले असले तरी वस्तुस्थिती उद्या पत्रकार बांधवांना स्वतः दाखवुन देईल त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा”, असे मिटकरींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

मिटकरींनी घेतलेल्या आक्षेपानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आमदारांच्या चहासाठी कपबशा न वापरता त्याऐवजी ग्लास वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोमवारी मिटकरी या या व्हिडिओची वस्तूस्थिती मांडणार आहे, याकडे साऱ्या आमदारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT